आंद्रा, ठोकळवाडी, पवना धरणात लॉन्च आणि होड्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय

रामदास वाडेकर
गुरुवार, 26 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - मावळ तालुक्यातील आंद्रा, ठोकळवाडी, पवना धरणात तसेच इंद्रायणी नदीपात्रात लॉन्च आणि होड्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ठोकळवाडी धरणातील होडी दोन वर्षांपूर्वी तर वराळेतील इंद्रायणी नदीतील होडी आठ दिवसापूर्वी बुडाली. पवना धरणातील लॉन्च अनेक वर्षापासून बंद आहे. मावळातील जल वाहतुक पूर्णपणे बंद आहे. प्रशासनाने होडी, प्रवाशी मोटार लॉन्च उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी केली. 

पुणे जिल्हा परिषदेचे उत्तर कार्यकारी अभियंता यांना म्हाळस्कर यांनी या आशयाचे निवेदन दिले असून, लॉन्च आणि होडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. ठोकळवाडीतील होडी बुडाल्याने वाहनगाव माळेगाव दरम्यानच्या प्रवास बंद झाला आहे. आंदर मावळातील धरणाच्या अलिकडे पलिकडे जाणाऱ्या प्रवाशांना पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. नाणोली तर्फे चाकण आणि वराळेला जोडणारी इंद्रायणी नदी पात्रातील होडी बुडाल्याने नाणोलीतून वराळेला येणारे विद्यार्थी आंबी मार्गी पायपीट करीत येत आहे. 

पवना धरणाच्या पलिकडे चावसर, मोरवेला जाणाऱ्या प्रवाशांची हीच गैरसोय होत आहे. प्रशासनाने वराळे नाणोलीत होडी किंवा लॉन्च,पवना धरणात मोटार लॉन्च, आंद्रा धरणात राजपुरी, शेटेवाडी, मंगरूळ, शेटेवाडीत प्रवाशी मोटार लॉन्च, महागावात होडी, वाहनगाव माळेगावला जोडण्यासाठी मोटार लॉन्च द्यावी अशी मागणी म्हाळस्कर यांनी केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून मोटार लॉज व लोखंडी प्रवाशी होड्या खरेदीसाठी सबंधित विभागाला प्रस्ताव सादर करावे असेही म्हाळस्कर यांनी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ कार्यालयाला सुचविले आहे.

Web Title: Inconvenience to passengers due to non-availability of botes in Andra, Thokalwadi, Pawana dam