दुकाने निरीक्षक कार्यालयात असुविधा

दीपेश सुराणा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पिंपरी - जुनी नादुरुस्त इमारत, इमारतीसमोर लाकूड आणि कचऱ्याचा ढीग, तुटलेल्या खिडक्‍या हे चित्र आहे, चिंचवड स्टेशन, दवाबाजार जवळील दुकाने निरीक्षक (सुविधाकार) कार्यालयाच्या इमारतीचे. कार्यालयात प्रवेश करताना जिन्याच्या पायऱ्या चढून जाताना दक्षता बाळगा; अन्यथा कपाळमोक्ष निश्‍चित आहे. कारण कार्यालयाजवळ आल्यानंतर पायऱ्यांचे लोखंडी संरक्षक ग्रील तुटले आहेत. 

पिंपरी - जुनी नादुरुस्त इमारत, इमारतीसमोर लाकूड आणि कचऱ्याचा ढीग, तुटलेल्या खिडक्‍या हे चित्र आहे, चिंचवड स्टेशन, दवाबाजार जवळील दुकाने निरीक्षक (सुविधाकार) कार्यालयाच्या इमारतीचे. कार्यालयात प्रवेश करताना जिन्याच्या पायऱ्या चढून जाताना दक्षता बाळगा; अन्यथा कपाळमोक्ष निश्‍चित आहे. कारण कार्यालयाजवळ आल्यानंतर पायऱ्यांचे लोखंडी संरक्षक ग्रील तुटले आहेत. 

सुमारे दीड लाख दुकाने या कार्यालयातंर्गत येतात. संबंधित कार्यालय १९८५पासून माथाडी कामगार बोर्डाच्या इमारतीत कार्यरत आहे. तर कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अखत्यारित आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधीतून वाट काढतच इमारतीत प्रवेश करावा लागतो. जिन्यात दिवे नाहीत. रंग उडालेल्या भिंती, जुने नोंदणी अर्ज आणि नोंदणी रजिस्टरचा साचलेल्या थप्पीमुळे जुन्या सरकारी कार्यालयात आल्याचा भास होतो. 

दृष्टिक्षेपात कार्यालय  
 कार्यक्षेत्र : पिंपरी-चिंचवड परिसर, मुळशी, चाकण, खेड, आंबेगाव.
 ऑनलाइन यंत्रणा : नवीन दुकानांची नोंदणी, नावात बदल, नूतनीकरणासाठी (नोव्हेंबर २०१५ पासून)
 ऑनलाइन अर्जांची तपासणी : महिन्याला सरासरी तीन हजार 
 इन्टिमेशन लेटर (सूचना पावती- शून्य ते ९ कामगार असलेल्या दुकानांसाठी) : २९ हजार ५०० (फेब्रुवारी ते ऑगस्ट २०१८)
 शॉप ॲक्‍ट परवाना : १ लाख २१ हजार ५९३ (नोव्हेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१८)

नवीन इमारतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. नंतरच कार्यालयाचे स्थलांतर होईल.
- सतीश तोतावार, सरकारी कामगार अधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालय

शून्य ते नऊ कामगार संख्या असलेल्या नवीन दुकानांसाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ऑनलाइन सूचना दिल्याची पावती (इन्टिमेशन लेटर) अत्यल्प खर्चात मिळते. दहा व दहापुढील कामगार संख्येसाठी शॉप ॲक्‍ट परवाना आवश्‍यक आहे.
- अरुण गायकवाड, दुकाने निरीक्षक (सुविधाकार)   

शॉपॲक्‍ट कार्यालयाची इमारत अत्यंत खराब स्थितीत आहे. अस्वच्छताही आहे. जिन्यावरील रेलिंग तुटले आहे. त्यामुळे ये-जा करणारी व्यक्ती खाली पडून त्याच्या जिवाला धोका संभवतो. येथे सुधारणा आवश्‍यक आहे.
- एन. कनन, व्यापारी

शॉपॲक्‍ट कार्यालयाची तातडीने दुरुस्ती व्हायला हवी. अंतर्गत भागातही सुधारणा आवश्‍यक आहेत. नोंदणी अर्ज, नोंदणी रजिस्टर यांचे स्कॅनिंग करावे. आवश्‍यक माहिती संगणकात साठविल्यास कागदपत्रांची रद्दी साचणार नाही.
- संदीप कुमार, नागरिक

Web Title: Inconvenience at the Shop Inspector Office