दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी 15 ते 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता 31 डिसेंबरपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. 
 
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी "http://form17.mh-ssc.ac.in' आणि "http://form17.mh-hsc.ac.in' या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळाने केले आहे.

Web Title: Increase in the application deadline for the SSC examination