पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट : कार चोरी अन् घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे. बिबवेवाडी परिसरात कारचोरीसह घरफोडी तर डेक्कन परिसरातील एका नामांकित बेकरीमध्येही चोरटयांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे. बिबवेवाडी परिसरात कार चोरीसह घरफोडी तर डेक्कन परिसरातील एका नामांकित बेकरीमध्येही चोरटयांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

बिबवेवाडीमध्ये एका दुकानासमोर पार्किंग केलेली होंडा सिटी कार चोरटयांनी पळवून नेली. त्याचबरोबर शेजारील दुकानाचे कुलूप तोडुन रोकड पळविली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, डेक्कन येथील आपटे रस्ता परिसरात असलेल्या एका नामांकित बेकरीमध्येही चोरटयांनी चोरी करत रोकड व वस्तू असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Increase in car theft and robberycases in Pune