जलसंधारण कामांमुऴे भूजल पातळीत वाढ - रोहित पवार

संतोष आटोळे 
रविवार, 10 जून 2018

शिर्सुफळ : ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, सीसीटी, माती बांध यासारख्या जलसंधारणांच्या कामांमुळे आगामी काळात भूजल पातळीमध्ये वाढ होईल व याचा फायदा उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची दुरु होईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

शिर्सुफळ : ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, सीसीटी, माती बांध यासारख्या जलसंधारणांच्या कामांमुळे आगामी काळात भूजल पातळीमध्ये वाढ होईल व याचा फायदा उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची दुरु होईल असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

सिध्देश्वर निंबोडी ( ता.बारामती) येथे खासदार शरद पवार यांच्या निधीतुन बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधारा, दलितवस्ती निधीतुन गावातील अंर्तगत रस्ते, व्यायाम शाळा या कामांच्या शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत,छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नामदेव ढवळे, ग्रामसेविका रंजना आघाव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, ज्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या त्यांना दुष्काळाची दाहकता माहित आहे. सुदैवाने आपल्या भागामध्ये शासकिय योजनांसह विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाली आहेत याचे फायदे भविष्यात दिसतील.सभापती संजय भोसले म्हणाले, शिर्सुफळ गुणवडी जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य रोहित पवार यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. यामध्ये ग्रामस्थांनीही राजकारण न आणता सर्व कामांवर देखरेख ठेवत कामे दर्जैदार करुन घ्यावीत चुकीची कामे होत असतील तर तात्काळ अधिकारी, पदाधिकारी यांच्या निर्दशनास आणुन देण्याचे आवाहन केले.

 

Web Title: Increase in ground water level for water works - rohit pawar