मुळशीकरांनो, सावध व्हा...कोरोना लागलाय हात धुवून मागे...

corona
corona

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले. आज सहा नवीन  कोरोनाबाधित सापडल्याने तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या आता ८९ झाली आहे. 

मुळशी तालुक्यातीली कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्यांची आज सकाळपर्यंत आकडेवारी ३२ होती. बरे झालेल्या काही रुग्णांना  उद्या घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बरे झालेल्यांचीही आकडेवारी दिलासा देणारी ठरणार आहे. एकही कोरोनाग्रस्त अद्याप दगावलेला नसून, एक महिला रुग्ण मात्र अत्यवस्थ अवस्थेत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजित कारंजकर यांनी दिली.  

आज तालुक्यात बावधन येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यात एका पुरुषाचा तर एका महिलेचा समावेश आहे. पिरंगुट येथे एक पुरुष, भूगाव येथे एक महिला रुग्ण , कोळवण खोऱ्यातील हाडशी येथे एक पुरुष, तर हिंजवडी येथे एक पुरुष कोरोनाबाधित सापडला आहे.  तीन दिवसांपूर्वी तालुक्यात सहा रुग्ण सापडले होते. काल तब्बल बारा रुग्ण सापडले होते. आज त्यात पुन्हा सहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील रुग्णांच्या संख्येने नव्वदीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. 

पिरंगुटला आता कोरोनाबाधितांची संख्या एकूण सातवर पोचल्याने पिरंगुटकरांना आता आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. पिरंगुट परिसरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांना कोरोना होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॅाकडाउन शिथिल झाल्याने आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविल्याने कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com