रिंगरोड नियोजित विमानतळापर्यंत वाढवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडला मान्यता देताना तो पुरंदर येथील नियोजित विमानतळापर्यंत वाढविण्यात यावा,'' अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे सातारा-सोलापूर-नगर-नाशिक या चारही महामार्गांवरून नियोजित विमानतळापर्यंत जलद गतीने पोचणे शक्‍य होणार आहे.

पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडला मान्यता देताना तो पुरंदर येथील नियोजित विमानतळापर्यंत वाढविण्यात यावा,'' अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे सातारा-सोलापूर-नगर-नाशिक या चारही महामार्गांवरून नियोजित विमानतळापर्यंत जलद गतीने पोचणे शक्‍य होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रादेशिक विकास आराखड्यातील (आरपी) रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय "पीएमआरडीए'ने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे. या वेळी चाकण आणि पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या संदर्भात चर्चा झाली.

चाकण "इंडस्ट्री'ला फायदा
प्रस्तावित रिंगरोड चाकण एमआडीसीपासून जातो. चाकणवरून हा रिंगरोड सोलापूर रस्त्यावर येऊन नियोजित विमानतळापर्यंत जोडावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याने चाकण येथील औद्योगिक कंपन्यांना हा विमानतळ जोडणे शक्‍य होणार आहे. त्याच बरोबर नगर रस्ता, सातारा रस्ता आणि नाशिक रस्त्याला हा रिंगरोड जोडणार आहे. या मार्गावरून नियोजित विमानतळाकडे जाण्यासाठी अन्य काही मार्ग आहेत. त्यांचाही विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

रिंगरोडच्या मध्यभागी मेट्रो
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीलगत पाच किलोमीटर अंतरावरून हा नियोजित रिंगरोड जाणार आहे. हा रस्ता 110 मीटर रुंदीचा आणि 128 किलोमीटर लांबीचा असेल. हा रस्ता चौदा पदरी राहणार असून त्यापैकी चार पदरी वेगवान वाहतुकीसाठी, तीन पदरी सेवा रस्ता आणि मध्यभागी मेट्रो प्रकल्पासाठी जागा राखीव असेल. हा संपूर्ण रस्ता सिग्नल फ्री राहील. सहा मेजर जंक्‍शनवर उड्डाण पूल, चार ठिकाणी बोगदे असतील.

आठ दिवसांत आदेश
मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यामुळे येत्या आठ दिवसांत रिंगरोडचे अंतिम मान्यतेचा आदेश काढण्यात येईल. त्यानंतर सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा मागवून रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Increase the planned airport ring road