उन्हाचा चटका वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - शहर आणि परिसरात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा चटका वाढला असून, पुढील चोवीस तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याने उन्हाची तीव्रता वाढत जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

मकर संक्रांतीनंतर शहरातील उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरवातीलाच उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली आहे. कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी शहरातील रस्त्या-रस्त्यांवर टोप्या, गॉगल्स, छत्र्या घेऊन बाहेर पडणारे पुणेकर दिसत आहेत. 

रात्रीच्या तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मात्र, सोमवारी सकाळी हवेत गारठा जाणवत होता. 

शहरात गेल्या दहा वर्षांपैकी 2009 मध्ये सर्वाधिक म्हणजे 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गेल्या वर्षी 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा या महिन्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास राहिले आहे.

Web Title: Increase temperature