कुकडी प्रकल्पाअंतरधरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Increase water in kukdi project intercropping

कुकडी प्रकल्पाअंतरधरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

नारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण लाभ क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या मुळे प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाच धरणांत आज सायंकाळी चार वाजेपर्यंत ४.३५ टीएमसी (१३.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पाच्या पाणी साठ्यात २.६८ टीएमसीने (७.९४ टक्के) लक्षणीय वाढ झालेली आहे.अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

कुकडी प्रकल्पा अंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे,डिंभे धरणांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ३० टीएमसी आहे. कुकडी प्रकल्प जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यांना वरदान ठरला आहे. शेती सिंचना खालील सुमारे दीड लाख एकर क्षेत्र कुकडी प्रकल्पावर अवलंबून आहे.या मुळे पावसाळ्यात कुकडी प्रकल्पात किती पाणीसाठा होतो. याकडे सात तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष असते. १ जुलै २०२२ अखेर कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात १.६७ टीएमसी (५.६६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

जुन महिना कोरडा गेल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांनी तळ गाठला होता.या मुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे भात खाचरे, ओढे भरून वाहू लागल्याने कुकडीच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या मुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मागील चोवीस तासात कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस झाला. या मुळे तळ गाठलेल्या पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्यात १.३४६ टीएमसीने वाढ झाली आहे.

डिंभे धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यात ०.९८६ टीएमसीने वाढ झाली आहे.आज अखेर धरण निहाय उपयुक्त पाणीसाठा टीएमसी,(कंसात टक्के): येडगाव :०.४७३(२४.३६ ),वडज: ०.२३०(१९.६५), डिंभे :१.५७६ (१२.६२ ), माणिकडोह: १.७५५ (१७.२४ ), पिंपळगाव जोगे धरणात ३.५७६ टीएमसी मृतसाठा झाला आहे.

Web Title: Increase Water In Kukadi Project Intercropping

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainwaterdamrainy session