पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दोन टीएमसीने वाढ

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 6 जुलै 2018

खडकवासला : टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला धरणात दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यात सुमारे दोन टीएमसीने वाढ झाली आहे.

या चार ही धरणात बुधवारी सकाळी 3.68 टीएमसी पाणीसाठा होता तो गुरुवारी संध्याकाळी 4.81 टीएमसी होती. शुक्रवारी सकाळी ती 5.52 टीएमसी झाली. अशा प्रकारे 1.850टीएमसी व महापालिकेने घेतलेले 0.100 टीएमसी पाणी धरले असता ही वाढ 1.950 ने वाढ झाली आहे. दीड दिवसात झालेली ही वाढ शहराला सुमारे पावणे दोन महिनाभर पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. 

वरसगावला यंदा पहिल्यादा पाणी जमा
वरसगाव धरणात पाणी जमा होऊ लागले. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातील पाणीसाठी शून्य करण्यात आला होता. त्यानंतर, डेड स्टॉक देखील धरणातून सोडला होता. दोन दिवसात या धरणात 0.660टीएमसी म्हणजे सुमारे 5.12टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अशी माहिती वरसगावचे शाखा अभियंता टी.डी. पाटील यांनी सांगितले. 

टेमघरला सव्वा दोनशे मिलिमीटर
टेमघर धरणात बुधवार सकाळपासून गुरुवार सकाळ पर्यंत 119 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळपासून 155मिलिमीटर पाऊस झाला आहे. अशा प्रकारे 274 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

दीड दिवसात वाढ झालेले दोन टीएमसी पाणी शहराला महिनाभर तर शेतीसाठी महिनाभर पुरेल एवढं जमा झाले आहे. चार ही धरणात मागील वर्षी पेक्षा पाणीसाठा कमी आहे. पाणी वेगाने वाढण्यासाठी पावसाची तीव्रता व सातत्य पाहिजे. 
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे, विभाग

खडकवासला धरणात वाढ 0.290टीएमसी
पानशेतमधील वाढ 0.710 टीएमसी
 वरसगावमधील वाढ 0.660 टीएमसी
 व टेमघरमधील वाढ 0.190 टीएमसी
 एकूण झालेली वाढ 1.950टीएमसी 

Web Title: increase in water level by 2 tmc in dam which water supply to pune