वडज, माणिकडोह धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 6 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : तालुक्यातील वडज व माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत मीना व कुकडी नदीतून दोन्ही धरणात नविन पाणी येण्यास सुरुवात झाली असून पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

वडजला 58.80 दशलक्ष घनफुट तर माणिकडोहला 213.75 दशलक्ष घनफुट नविन पाणी आले आहे यामुळे वडज 13 टक्के तर माणिकडोह धरण 10 टक्के भरले आहे. माणिकडोह येथे एकूण 162 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा आजचा उपयुक्त पाणीसाठा 1016 दशलक्ष घनफुट असून मागील वर्षी तो 1507 दशलक्ष घनफुट इतका होता. गेल्या वर्षापेक्षा पावसाचे प्रमाण यावर्षी कमी आहे.यामुळे पाणीसाठ्यात कमी वाढ झाली आहे. 

वडज धरणात 157.12 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा असून आजअखेर 153 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मीना नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसाने नदी दुथडी वाहू लागले आहे तर उन्हाळ्यात कोरडे पडलेल्या बंधाऱ्यातून पाणी वाहू लागले आहे.

Web Title: increase water level of wadaj manikdoh dams