Pune : साहित्यात महिलांचा सहभाग वाढावा ; अभिनेते योगेश सोमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune
साहित्यात महिलांचा सहभाग वाढावा अभिनेते योगेश सोमण यांची अपेक्षा; ‘फुलोरा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

साहित्यात महिलांचा सहभाग वाढावा; अभिनेते योगेश सोमण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाविद्यालयीन जीवनामध्ये कलेची जोपासना करणारे कलाकार, व्यवहारिक जीवनाच्या जंजाळात अडकल्यावर कुठे तरी मागे पडतात. आजच्या काव्यसंग्रहात सर्वाधिक कविता कवयत्रींच्या आहेत. मात्र, साहित्य संमेलनांचे अध्यक्ष किंवा एकंदरीत साहित्य विश्वात महिलांचा सहभाग कमी दिसतो. कला ही जगण्याची ऊर्जा असून, जास्तीतजास्त महिलांनी साहित्यातील सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केली.

टिळक रस्ता येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित ‘फुलोरा’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या साहित्य आघाडीच्या वतीने या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी, जिल्ह्या कार्याध्यक्ष मंदार रेडे आदी उपस्थित होते. साठ हुन अधिक नवोदित कवींच्या या संग्रहात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सोमण म्हणाले, ‘‘माझ्या मते सर्वश्रेष्ठ साहित्यकार हा कवी असतो. कारण लेखकाकडे शब्दांचा मोठा संग्रह असला तरी तो कमी शब्दात त्याची कल्पना मांडू शकत नाही. मात्र, कवी विश्वव्यापी कल्पना अगदी कमी शब्दात मांडतो.’’
ब्राह्मण महासंघाने कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती रेडे यांनी यावेळी दिली. ज्ञाती संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व महासंघाच्या वतीने घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ब्राह्मण ही जात नसून, तो एक संस्कार आहे. समाजाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी ब्राह्मण्याची आहे, असे मत कुलकर्णी यांनी मांडले.

मी अंधभक्त नाही
माझ्या पाठीमागे जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार किंवा पाठिंबा आहे. मी अंधभक्त नाही, रॅशनल विचार करतो. तो मांडतोही. एखाद्या गोष्टींमागची कारणमीमांसा करता आली पाहिजे, असे सोमण म्हणाले.

loading image
go to top