तरुणांमध्ये सेवाभावी वृत्ती वाढली - गोखले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - ""कोणत्याही सामाजिक कामाची सुरवात ही वेदनेने होते. या वेदनेतूनच अनेक मदतीचे हात पुढे येतात. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक मदतीसाठी पुढे येत होते; मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून तरुण मुले-मुली देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. शालेय मुलांमध्येही सामाजिक कार्याची जाणीव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,'' असे मत "देणे समाजाचे' या संस्थेच्या प्रमुख वीणा गोखले यांनी व्यक्त केले. 

"स्नेहालय' संस्थेच्या वतीने यंदा भगिनी निवेदिता बॅंकेच्या अध्यक्षा मीनाक्षी दाढे आणि वीणा गोखले यांना "स्नेहाधार पुरस्कार' देण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना गोखले बोलत होत्या. या पुरस्कारांचे वितरण सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. "स्नेहालय'चे (नगर) संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रकाश आपटे, प्रकल्प संचालक डॉ. शुभांगी कोपरकर आदी उपस्थित होते. डॉ. मुजुमदार म्हणाले, ""हुशार मुले मोठी होऊन शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी होतात; तर अनेक विषयांमध्ये लक्ष घालणारी मुले नेते आणि सामाजिक कार्यकर्ते होतात.'' गोखले म्हणाल्या, ""सावकारी हे एक दुष्टचक्र आहे, यामुळे होणारी महिलांची पिळवणूक रोखण्याचा प्रयत्न बॅंकेद्वारे केला जात आहे.'' या वेळी डॉ. कुलकर्णी, आपटे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. कोपरकर यांनी केले. 

Web Title: Increased charitable attitude in young people