खडकवासला परिसरात वाढलाय कोरोनाचा धोका, पण नागरिकांकडून...

corona
corona

खडकवासला (पुणे) : खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनच्या रुग्णांची संख्या मर्यादित होती. पण, मागील आठवड्यापासून या भागातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागातील सत्तर जण सध्या शहर  नागरिकांकडून कोरोनासंदर्भातील आरोग्य विभागाच्या सूचना पाळल्या जात नाहीत. रुग्णवाढीचे  हेच प्रमुख कारण आहे, असे हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले. 

नागरिकांकडून घराबाहेर पडताना मास्क व रुमाल वापरला जात नाही.  काही जण वापरतात, परंतु तो गळ्याभोवती ठेवला जातो.  मास्क, रुमाल तोंडावर व नाकावर असला पाहिजे. डोळ्यावर देखील गॉगल, प्लॅस्टिक फेस शिल्ड वापरले पाहिजे. कामानिमित्त विविध ठिकाणी गेल्यानंतर सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क न वापरल्यास वापरल्यास दंड करण्याची तरतूद करण्यात आली  आहे. परंतु, त्याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर आणि स्थानिक पोलिसांमार्फत याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.  लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे  शहर किंवा परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या नातेवाईकांना व होम क्वारंटाइन रुग्णांना भेटायला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे देखील रुग्णांची संख्या वाढली आहे. 

कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतरही नागरिक स्थानिक पातळीवर उपचार घेत आहेत. संबंधित डॉक्टरने तपासणी करण्यास सांगितल्यास दुसऱ्या खासगी दवाखान्यात जातात. मात्र, सरकारी आरोग्य केंद्रात जात नाहीत. याबाबत डॉ. तालुका आरोग्य अधिक सचिन खरात यांनी सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे लक्षण आढळल्यानंतर तातडीने सरकारी रुग्णालयात जाऊन या संदर्भात उपचार करावेत. येथील वैद्यकीय अधिकारी तुम्हाला योग्य त्या सूचना देतील, असे डॉ. सचिन खरात यांनी सांगितले. 

सध्या ग्रामीण भागात खानापूर- २४, नऱ्हे -१३,  कोंढवे धावडे- ७, न्यू कोपरे- ७, डोणजे- १, घेरा सिंहगड-सांबरेवाडी- १, खडकवासला- २, नांदेड- ४, खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील गुजरवाडी, मांगडेवाडी,  भिलारेवाडी जांभूळवाडी आणि खेड या परिसरात सुमारे पंधरा ते सतरा रुग्ण उपचार घेत आहेत. अशाप्रकारे सुमारे ६८ ते ७० जण उपचार घेत आहेत. यात अनेक ठिकाणचे लोकांची तपासणी करावयाची आहे. काही जणांची अद्याप झालेली नाही. त्यांच्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढणार आहे. नांदेड व न्यू कोपरे येथे प्रत्येकी एक एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com