मुळशीत वाढला कोरोनाचा धोका, पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांना दणका 

PIRANGUT
PIRANGUT

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यात आज कोरोनाचे आणखी ९ रुग्ण सापडेल असून, आता तालुक्यात कोरोनाचे एकूण १६९ रुग्ण झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू केलेल्या वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर पौड पोलिसांनी कडक कारवाई केली. १५४ जणांवर कारवाई करताना ७७ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या ७ व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.  

मुळशी तालुक्यात आज सापडलेल्या कोरोनोच्या रुग्णांत पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आज दोने वाढली असून, तालुक्यात आता ४३ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. आज भुकूम, कासारसाई , शिंदेवाडी, बावधन, नांदे व पिरंगुट आदी गावांत प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून, मारुंजी येथे तीन रुग्ण सापडले आहेत.   

मुळशी तालुक्यात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित तब्बल ९६ रुग्ण सापडले होते. सरासरी दहाच्या पुढेच आकडेवारी होत चालल्याने रोजचा आलेखही चढताच होता. या पार्श्वभूमीवर आज तालुक्यात नवीन ९ रुग्ण सापडले. काल तालुक्यात उच्चांकी म्हणजे २६ कोरोनाग्रस्त सापडले होते. परवा तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला, तर २२ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले 
होते. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू केलेल्या वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर पौड पोलिसांनी कडक कारवाई केली. १५४ जणांवर कारवाई करताना ७७ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या ७ व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.  पुणे- कोलाड रस्त्यावर पिरंगुट व भूगाव आदी दोन ठिकाणी नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. 

पौड पोलिक ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भालचंद्र शिंदे, उपनिरीक्षक अनिल लवटे, श्रीकांत जाधव, हवालदार अब्दुल शेख, नाईक जय पवार, शिपाई मयुर निंबाळकर, तुषार भोईटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.  
                 
Edited By : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com