#PMClssues पाणीटंचाईमुळे टॅंकरचालकांची चलती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

हडपसर - परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. त्यातच महापालिकने हडपसर भागात पाण्याची कपात केली आहे. त्यामुळे रामटेकडी येथील महापालिकेच्या टॅंकर भरणा केंद्रावर गर्दी होत आहे. रामटेकडी येथील टाकीचे प्रेशर कमी जास्त होत असल्याने अनेकदा टॅंकर भरले जात नाहीत. त्यामुळे  नागरिकांना पैसे देऊनही टॅंकर मिळत नसल्याचा प्रकार अनेकदा घडतो. त्यामुळे पाणीटंचाईमुळे टॅंकरचालकांचा व्यावसाय मात्र तेजीत सुरू आहे. 

उन्हाळ्यामुळे टॅंकर भरणा केंद्राची वेळ वाढवून सकाळी सात ते सायंकाळी सहा करण्यात आली आहे. या केंद्रावर टेंडर व पासधारक टॅंकर भरले जातात. या केंद्रावरून महापालिका हद्द व हद्दीबाहेरील गावांना पाणीपुरवठा केला जातो. महंमदवाडी, काळेपडळ, सय्यदनगर, ससाणेनगर, चिंतामणीनगर, तरवडेवस्ती, कृष्णानगर, हेवन पार्क, न्याती इस्टेट, केशवनगर, मुंढवा या ठिकाणी अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे महापालिका या ठिकाणच्या अनेक भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करते. साधारणतः 45 ते 50 टॅंकर या भागात सुरू आहेत. 

तसेच देवाची उरुळी येथे 38, फुरसुंगी येथे 70, शेवाळेवाडी येथे 27, मंतरवाडी येथे 19 टॅंकर पाणी महापालिका देते. काळेपडळ, महंमदवाडी या भागात काही भागात दिवसाआड पाणी येते. त्याची वेळ अनियमित असते. त्यामुळे नागरिकांना कामधंदा सोडून पाण्याची वाट पाहवी लागते. पाणी आले तरी त्याचे प्रेशर कमी असते. त्यामुळे नागरिकांना अन्य भागातून पाणी आणावे लागते. याबाबत नागरिकांनी आंदोलन करूनही व नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करूनही अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. 

टॅंकरचालकांकडून लूट 
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत एका टॅंकरसाठी नागरिकांना मोजावे लागतात. काही सोसायट्यांना वर्षभर टॅंकरने पाणीपुरवठा होतो. अशा सोसायट्यांना मात्र नियमित टॅंकर घेत असल्याने वाढीव दर न आकारता नेहमीच्या दराने पाणीपुरवठा होतो. वापरण्याच्या पाण्यासाठी या भागात अनेक खासगी विहिरीतून टॅंकर भरून या पाण्याची विक्री होते. अशा 15 ते 2 विहिरी या भागात आहेत. काही टॅंकरचालक मात्र रामटेकडी टॅंकर भरणा केंद्रातील पाणी आहे, असे सांगून ते पिण्याचे पाणी आहे, असे सांगून नागरिकांची फसवणूक करतात.

Web Title: increased in water tanker in hadapsar