वाढते वायू प्रदूषण धोक्‍याची सूचना

Dr. Gufrain
Dr. Gufrain

पुणे : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घातला नाही तर प्रत्येकासाठी ही धोक्‍याची सूचना आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पुणे येथील आयआयटीमएम सफरचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा स्थापना दिन व जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी वाहन प्रदूषण नियंत्रण करण्यात यावे, यासाठी प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी विकसित केलेल्या 'विश्‍वास सायलेन्सर' वाहनांना बसवून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या वेळी 'आयसीसीआयडीडी'चे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पांडव, दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. संजय झोडपे, टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, चेस्ट रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी, डॉ. राजेश कुमार व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. पी. तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एस. परशुरामण, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे -पाटील, प्रा. मिलिंद पात्रे हे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com