पुणे : हवेलीत वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या; सोमवारी दिवसभरात...

Corona Virus
Corona Virus

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याभोवतीचा फास कोरोनाने पुन्हा एकदा आवळण्यास सुरुवात केली असून, सोमवारी (ता. १३) दिवसभरात तालुक्यात तब्बल ८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व हवेलीत रुग्णवाढीची संख्या चिंताजनक असून, पूर्व हवेलीमधील केवळ सहा ग्रामपंचायत हद्दीत 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. वरील ८४ नव्या रुग्णामुळे हवेलीमधील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५४० वर पोचली आहे. 

हवेलीत मांजरी बुद्रुक (२०), लोणी काळभोर (४), कदमवाकवस्ती (८), कुंजीरवाडी (१), आळंदी म्हातोबाची (५), उरुळी कांचन (५), आव्हाळवाडी (१), गोऱ्हे खुर्द (१), केसनंद (४), खडकवासला (४), किरकिटवाडी (१), वडकी (४), नांदेड (३), नऱ्हे (२), खानापुर (२), मालखेड (१), वरदडे (१), पेरणे (१), कोंढवे-धावडे (६), वळती (१), पिंपरी सांडस (१), निरगुडी (१), फुरसुंगी (२) व वाघोली (५) या वरील २४ ग्रामपंचायत हद्दीत ८४ नव्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे. 

व्हीटीएम किट मिळाले, पूर्व हवेलीत आजपासून स्वॅब चाचण्या वाढणार...

पूर्व हवेलीमधील नागरिकांच्या सोईसाठी महिनाभरापूर्वी लोणी काळभोर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असले तरी, रुग्णाचा स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी हवे असलेले व्हीटीएम किट पुरसे उपलब्द होत नव्हते. यामुळे स्वॅब तपासनीसाठी नागरीकांना वणवण करावी लागत होती. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हवेली पंचायत समितीला सोमवारी एक हजार व्हीटीएम किट मिळाले आहेत. यामुळे लोणी काळभोरसह हवेली तालुक्यातील सर्वच कोविड केअर सेंटरमधुन स्वॅबच्या चाचण्या वाढणार आहेत. यापुढील काळात जिल्हा परिषदेकडून 
व्हीटीएम किटचा पुरेसा पुरवठा होईल, असा विश्वास डॉ. सचिन खरात यांनी व्यक्त केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मांजरीत स्वॅब कलेक्शन सेंटर आजपासून सुरु

मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तीन दिवसापुर्वी नागरीकांच्या सोईसाठी मांजरी बुद्रुक येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सुचनेनुसार मांजरी बुद्रुक येथे मंगळवारपासून स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने कर्मचारी उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे.

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com