जुन्नरकरांनो, कोरोना होणार नाही, या भ्रमात राहू नका... 

corona
corona

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या विविध गावातून कोरोना बधितांची संख्या आजअखेर ७८ इतकी झाली असून, यातील सुमारे ३६ रुग्ण हे मुंबईचे आहेत, तर उर्वरित मुंबई व अन्य ठिकाणच्या कोरोना बधितांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे मी मुबंईला गेलो नाही, मला कोरोना होणार नाही, या भ्रमात स्थानिक नागरिकांनी राहू नये, आपल्या आरोग्याची आपणच काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे व अन्य ठिकाणाहून जुन्नर तालुक्यात विविध कारणास्तव आलेल्या नागरिकांची संख्या ६०  हजारांहून अधिक असल्याचे समजते. यात मुबंईकर अधिक आहेत. बाहेरगावाहून आलेल्या अनेक जणांनी कोरोनाचा गांभीर्य माहीत असल्याने आपला होम किंवा संस्थात्मक क्वारंटाइनचा कालावधी चांगल्या प्रकारे पार पाडला आहे. त्यामुळे चिंता ही स्थानिक नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. मी मुबंईला गेलो नसलो, तरी लॉकडाउन शिथिल झाल्याने मुंबईकर व अन्य ठिकाणाहून आलेले नागरिक अवतीभवती वावरत आहेत, याची जाणीव समाजात वावरताना ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जुन्नरला खानगाव येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या ७८ इतकी झाली असून, त्यापैकी ४२ जण बरे झाले, असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसत असल्यास घरातच एक दोन दिवस स्वतंत्र राहिले पाहिजे. जर बरे वाटले नाही, तर जवळच्या ग्रामीण रुग्णालय अथवा कोविड सेंटर येथे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क शिवाय वावरू नये, सामाजिक अंतर राखावे, सॅनिटायझरचा वापर करावा, कामाशिवाय शक्यतो बाहेर पडू नये, इतकी काळजी घेतली तरी कोरोनापासून दूर राहणे सहज शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जुन्नर तालुक्यात गावनिहाय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : शिरोली खुर्द- ४, उंब्रज नंबर एक- ४, बल्लाळवाडी- ४, निरगुडे- ३, खानगाव- २, पिंपळवंडी- ३, धनगरवाडी, खामुंडी, उंब्रज नंबर दोन, ओतूर, पिंपळगाव जोगा, येणेरे विठ्ठलवाडी, वारूळवाडी, जुन्नर, पिंपळगाव- आर्वी, नेतवड,  उंचखडक- राजुरी, संतवाडी- आळे, बोरी बुद्रुक, खानापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com