विवाहपूर्व समुपदेशनाकडे वाढता कल

विवाहपूर्व समुपदेशनाकडे वाढता कल

पुणे : विवाहपूर्व समुपदेशनाकडे तरुणाईचा कल वाढला आहे. पूर्वी विवाह जुळवून आणण्यासाठी केवळ कुटुंबाची भूमिका असायची. आता मात्र मुला-मुलींची मानसिकता, नोकरी, पगार हे सगळेच लक्षात घेतले जाते. तरीही बरेच विवाह अयशस्वी होताना तर काहींमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहेत. या परिस्थितीमुळेच विवाहपूर्व समुपदेशन घेण्यासाठी तरुणाईची आणि विशेषतः तरुणींची ओढ असल्याचे "सकाळ'च्या निरीक्षणात आढळून आले. 

विवाह ठरल्यानंतर आपल्यातील शारीरिक कमीपणावर योग्य उपचार घेण्याऐवजी झटपट उपचाराने त्या कशा लपवता येतील, यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. शिवाय विवाहपूर्व काही वैद्यकीय चाचण्या करून घेणेही महत्त्वाचे असते. एचबी इलेक्‍ट्रो फोरेसिस ही चाचणी महत्त्वाची आहे. यातून "थॅलेसिमिया' आणि "सिकलसेल' यांची स्थिती कळते. "थॅलेसिमिया'मध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे सामान्य माणसांपेक्षा वेगळे असते. हे प्रमाण एकात असेल तर काही हरकत नाही, पण हे प्रमाण दोघांतही असल्यास लग्न न करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अपत्याचे रक्त आयुष्यभर बदलत राहावे लागेल. 

मुलींना लग्नात आपल्या त्वचेचा रंग उजळलेला पाहिजे असतो; पण त्वचेचा मूळ रंग बदलविण्याच्या उपचारपद्धती आर्थिकदृष्ट्या तर महागात पडतातच; पण त्यामुळे त्वचेचा पोत कायमचा घसरू शकते. याबाबतही डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. 

शारीरिक आजार हे सामान्य माणसाला काही प्रमाणात कळू शकतात; पण मानसिक आजार कळणे आणि तो समजून घेणे हे मात्र सामान्य माणसाच्या आवाक्‍याबाहेरचे आहे. "सायकॉटिक डिप्रेशन' कळूनच येत नाही. त्यामुळे विवाहानंतर एकमेकांच्या मानसिक आजाराबद्दल कळून मतभेद, आत्महत्या, नातेच तुटणे असे प्रकार घडतात. 

- डॉ. सविता देशपांडे, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक 

पिल्स आणि लेझर उपचार करून घेण्याची मागणी मुलींकडून जास्त असते. अगदी महिनाभरानंतर लग्न असते आणि मुली त्वचेवरील उपचारासाठी येतात. पुढच्या महिनाभरातच ब्रायडल मेकअप करतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. असे उपचार हे लग्नाच्या निदान तीन महिने आधीपासून सुरू करावे. 

- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग व सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com