अतिनील किरणांचे प्रमाण वाढतेय

अतिनील किरणांचे प्रमाण वाढतेय

पुणे - पुणेकरांनो, तुम्ही दुपारी १२ ते ३ या दरम्यान शक्‍यतो घराच्या किंवा कार्यालयाच्याबाहेर पडू नका. कारण, उन्हाच्या वाढत्या चटक्‍याबरोबर अतिनील किरणांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातून त्वचा भाजून निघण्याचा धोका तर आहेच, पण त्वचेचे विकार आणि कर्करोगाचीही भीती आहे. 

 शहरात जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्‍यात अतिनील किरणांचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, रविवारी या किरणांचे प्रमाण वाढत गेल्याचे निरीक्षण पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे’च्या (आयआयटीएम) ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँण्ड रिसर्च’तर्फे (सफर) नोंदविण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी सूर्याची किरणे तिरकी जमिनीवर येतात; पण दुपारी १२ ते ३ या वेळेत सरळ पडत असलेल्या सूर्यकिरणांमध्ये अतिनील करणे असतात. 

सूर्यप्रकाशातून ‘व्हिटॅमिन डी’ मिळते; पण भरदुपारी उन्हात वावरणे अतिनील किरणांमुळे त्रासदायक ठरण्याची शक्‍यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सूर्योदयानंतर अतिनील किरणांचे प्रमाण वाढत जाते. दुपारी दोन वाजता ते जास्त असते. दुपारी तीननंतर हे प्रमाण कमी होते. रात्री अतिनील किरणांची पातळी शून्य असते.

पुणे, मुंबईत सध्या तरी धोका नाही
अतिनील किरणांचे प्रमाण वाढले असले तरी, पुणे आणि मुंबईमध्ये ते धोक्‍याच्या पातळीवर अद्यापपर्यंत तरी गेलेले नाही. उलट, दिल्लीमध्ये हे प्रमाण मोठ्या धोक्‍याच्या पातळीवर असून, अहमदाबादमध्ये ते मध्यम धोक्‍याच्या पुढे सरकत आहे.

काय दुष्परिणाम होतो?
त्वचा होरपळते
मोतीबिंदू होतो
त्वचेचे विकार
त्वचेचा कर्करोग

ही काळजी घ्या
भरदुपारी सूर्यकिरण थेट अंगावर पडू देऊ नयेत
सूर्यकिरणांपासून बचाव होईल असे कपडे घालावेत
गॉगलचा वापर करावा

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com