‘स्टार्टअप’साठी ‘इनक्‍युबेशन सेंटर’

incubation-center
incubation-center

पिंपरी - नवोदित उद्योजकांना प्रशिक्षण देणे, शासकीय योजनांची माहिती देणे, उत्पादन तयार करण्यासाठी चाचणी व गुणवत्तेच्या सुविधा उपलब्ध करणे आणि आवश्‍यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत ‘स्टार्टअप इनक्‍युबेशन सेंटर’ सुरू करण्यात आले. 
त्यामुळे नवीन उद्योगांना चालना मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, ऑटो क्‍लस्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीतील पॅन सिटी प्रकल्पांतर्गत स्टार्टअप इनक्‍युबेशन सेंटरचे कामकाज चालणार आहे. त्याचे उद्‌घाटन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते झाले. ऑटो क्‍लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, मराठा चेंबरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव उपस्थित होते.

‘स्मार्ट सिटी’चा प्रवास
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहराची निवड झाल्यानंतर १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीची स्थापना झाली. स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत स्टार्टअप इनक्‍युबेशन सेंटरचे कामकाज चालणार आहे. याबाबतचा ठराव स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने १९ जुलै रोजी मंजूर केला होता. याअंतर्गत करण्यात येणाऱ्या सामंजस्य कराराचे अधिकार स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वहन समिती (एसपीव्ही) स्थापन केली जाईल.

यामध्ये ऑटो क्‍लस्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि मराठा चेंबरच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. या अनुषंगानेच या दोन्ही संस्थांसह पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये १७ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार झाला आहे. स्मार्ट सिटीने या सेंटरसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. हर्डीकर म्हणाले, ‘‘या सेंटरच्या माध्यमातून विविध उद्योग स्थापन करण्यासाठी मदत होईल. तरुणांना मार्गदर्शन मिळेल. सध्या आव्हाने मोठी आहेत. मात्र, या योजनेच्या माध्यमातून अनेकांना गुंतवणुकीची संधी मिळणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com