इंदापूरसाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातुन १ कोटी १९ लाख

राजकुमार थोरात 
शनिवार, 14 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातुन  इंदापूर तालुक्यासाठी  रस्ते व बंदिस्त गटार  योजनेसाठी  १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

वालचंदनगर (पुणे) : ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातुन  इंदापूर तालुक्यासाठी  रस्ते व बंदिस्त गटार  योजनेसाठी  १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

यामध्ये तालुक्यातील आठ गावातील २१ रस्ते व ४ बंदिस्त गटार योजनेसाठी शासनाने १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून गलांडवाडी क्रंमाक- २ च्या परीसरामध्ये ३८ लाख रुपये खर्चुन रस्ते, व गटार योजना करण्यात येणार आहे. अंथुर्णे येथे गावठाण अंतर्गत कॉंक्रीट रस्ता करण्यासाठी १५ लाख तर बंदिस्त गटार करण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. पिटेकेश्‍वर गावाच्या परीसरामध्ये रस्ते करण्यासाठी १२ लाख रुपये, सणसर येथील अशोकनगर अंतर्गत कॉंक्रीट रस्ता करणे व बंदिस्त गटार करण्यासाठी प्रत्येकी १० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

शेटफळ गढे येथील अशोकनगर येथे बंदिस्त गटार योजनेसाठी ५ लाख,चव्हाणवस्ती ते नीरा भीमा कारखाना ते लाखेवाडी चौफुला रस्त्यासाठी ५ लाख,पाटोळेवस्ती ते बीकेबीएन रस्त्यासाठी ५ लाख व वरकडे वस्ती ते चाकाटी-लाखेवाडी रस्त्यासाठी ९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली.
 

Web Title: for indapur 1 crore 19 lack fund from panchayat raj