इंदापूर : युरोपातील भोरड्या पाहुण्यांचे उजनीत आगमन

सायंकाळच्या वेळी या भोरड्यांची कवायत पाहण्यासाठी पक्षी निरिक्षकांसह ग्रामस्थ गर्दी करत आहेत.
युरोपातील भोरड्या पाहुण्यांचे उजनीत आगमन
युरोपातील भोरड्या पाहुण्यांचे उजनीत आगमनSakal

कळस : युरोपातून (Europe) सुमारे पाच हजार किलोमिटर लांबीचा प्रवास करुन आलेल्या भोरड्या उजनी जलाशयालगत (Ujani Dam) सर्रासपणे पहायला मिळत आहेत. सायंकाळच्या वेळी या भोरड्यांची कवायत पाहण्यासाठी पक्षी निरिक्षकांसह ग्रामस्थ गर्दी करत आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण, मदनवाडी, भादलवाडी, कुंभारगाव परिसरात या भोरड्यांचा सायंकाळचा मुक्काम आढळून येत आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या भोरड्या मावळतीच्या सोनेरी प्रकाशात कवायत करतानाचे दृष्य नय़नरम्य दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील या परिसरात भोरड्या हजेरी लावत आहेत. पाण्यातील झाडे, काटेरी झाडे, वड व पिंपळासारख्या मोठ्या झाडांवर या भोरड्यांचा रात्रीचा मुक्काम असतो. रात्रीचा मुक्काम असलेल्या ठिकाणी पोचण्याअगोदर या भोरड्या उथळ पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करतात. यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी उंच आकाशात त्यांची कवायत असते. कवायतीदरम्यान या थव्यांमध्ये भोरड्यांचे अनेक छोटे-मोठे थवे सहभागी होतात.

युरोपातील भोरड्या पाहुण्यांचे उजनीत आगमन
छत्रपती शिवाजी महाराजांना काशीमधून प्रेरणा मिळाली होती - PM मोदी

रात्रीचा मुक्काम संपला की सकाळी खाद्यान्नाच्या शोधात या आपल्या सोईनुसार छोट्या-छोट्या थव्यात विभागणी करुन निघून जातात. ज्वारी, किटक, छोटी फळे हे त्यांचे खाद्यान्न आहे. या पक्षांकडून बीज प्रसारणाचे काम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, या पक्षांना मानवाचा मित्र समजले जाते. डिसेंबरमध्ये आलेल्या या पक्षांचा मुक्काम एप्रिलपर्यंत असतो.

दरम्यान कुंभारगाव येथील पक्षी निरीक्षण दत्ता नगरे म्हणाले, लाखोंच्या संख्येने आलेल्या या भोरड्यांची सायंकाळी होणारी कवायत नेत्रसुखद असते. यासाठी सध्या अनेक पक्षी प्रेमी या भागात हजेरी लावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com