esakal | गरीब माणसांचा आशीर्वाद कायम बरोबर राहतो - राज्य मंत्री दत्तात्रय भरणे | Indapur
sakal

बोलून बातमी शोधा

दत्तात्रय भरणे

गरीब माणसांचा आशीर्वाद कायम बरोबर राहतो - राज्य मंत्री दत्तात्रय भरणे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : कोरोना महामारीमुळे गरिबांच्या औषधोपचार खर्चाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रोज इंदापूर तालुक्यातील सरासरी एक रुग्णावर आम्ही मोफत उपचार करतो. गोर गरिबांना मदत करणे आमच्या रक्तातच आहे . कारण श्रीमंत लोक मदत केलेली विसरतात मात्र गरिबांना मदत केल्यास त्यांचा आशीर्वाद कायम बरोबर राहतो असे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुंबई येथील श्रीमती कोकीलबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल तसेच कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात ९ ऑक्टोबर रोजी ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी मोफत हदय रोग तपासणी व शस्त्रक्रिया, श्रवण क्षमता चाचणी (बहिरेपणा) तसेच रक्तदान शिबीराचे उदघाटन तसेच बावडा तेथील एक व भिगवण येथील दोन रुग्ण वाहिकेचे लोकार्पण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा: चंद्रपूरनंतर नागपुरात सिलिंडरचा स्फोट; तिघे गंभीर जखमी

यावेळी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईहुन रुग्ण तपासणीसाठी आलेले हदयरोग चिकित्सक डॉ. प्रशांत बोबाटे, श्रवण विकार चिकित्सक डॉ.शगुप्ता,डॉ.श्रीरंग करंदीकर, डॉ.आसावरी तावडे, डॉ.सुरेंद्र गालफडे, इंदापूर मुक्ताई ब्लड बँकेचे अध्यक्ष अविनाश ननवरे, रथचक्र चालक नितीन खिलारे,गणेश घाडगे, रमेश टूले, वैभव भोसले, तानाजी माने, नासिर मोमीन, आनंद माने, दत्तात्रय माने यांना कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

मंत्री भरणे पुढे म्हणाले,मुंबई येथील श्रीमती कोकीलबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सामाजिक कार्य स्तुत्य आहे.कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोनाकाळात १८ हजार पिशव्या विक्रमी रक्त संकलन झाले आहे मात्र आम्ही हलगी वाजवून त्याचे प्रदर्शन करत नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करतो मात्र सामाजिक कार्यात आम्ही राजकारण आणत नाही अशी टीका त्यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. यावेळी तानाजीराव हंगे, प्रशांत पाटील, प्रताप पाटील, सचिन सपकळ, मधुकर भरणे, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, नाना नरुटे, बाळासाहेब ढवळे, नवनाथ रुपनवर, ऍड भारत जगताप, रमेश देवकर उपस्थित होते. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे व संचालक श्रीराज भरणे यांनी केले. सुत्रसंचलन अमोल धापटे तर आभार प्रदर्शनअतुल झगडे यांनी मानले.

loading image
go to top