म्हशीच्या दुधाला मिळाला ६२ रुपये एवढा उच्चांकी दर; कोणता दूधसंघ देतोय एवढा दर?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

या सहकारी दुध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव आणि त्यापेक्षा जादा दर मिळत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदापूर : इंदापूर दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाकडे दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६२ रुपये एवढा दर मिळाल्याची चर्चा गुरुवार (ता.२५) पासून पंचक्रोशीत सुरू झाली आहे. दूधगंगा संघाकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये हमीभाव मिळत आहे.

- जुन्नरकरांनो, कोरोनाचा आकडा वाढतोय; आज पोलिस अधिकारी अडकला कोरोनाच्या जाळ्यात!

अनेक शेतकऱ्यांना दुधाच्या गुणवत्तेनुसार 26 ते 27 रुपये असाही दर मिळत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. संघाचे संस्थापक माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धवल क्रांतीस संघ सज्ज असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील आणि उपाध्यक्ष उत्तम जाधव यांनी दिली.

- Feel the Beat : कोरोना संकटात ड्युटी बजावणाऱ्या 'खाकी किंग'ची गौरवगाथा; वाचा सविस्तर!

दूधगंगा दूधसंघाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील या दूधसंघाने देशातील नामांकित अमूल दूध संघाबरोबर नुकताच 5 वर्षांचा करार करून दूधसंघाचे संकलन ८ जूनपासून सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचे प्रत्येकी १० दिवसांचे पेमेंट बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. दूधगंगा संघ हा तालुक्यातील एकमेव सहकारी दूधसंघ आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

या सहकारी दुध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव आणि त्यापेक्षा जादा दर मिळत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये अमूलच्या सहकार्याने पशुखाद्य, वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहेत.

Image may contain: text

(सदर दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळालेली दूध पावती)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Indapur buffalo milk got a high price of Rs 62 per litre