इंदापूर कॉलेज झालं डिजिटल; विद्यापीठाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सगळ्यांत पहिला उपयोग

ब्रिजमोहन पाटील
रविवार, 2 ऑगस्ट 2020

प्राध्यापकांनी व्हिडिओ तयार केल्यानंतर पुणे विद्यापीठातील अद्ययावत स्टुडिओमध्ये ते व्हिडिओ एडीट करून ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशनचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओमध्ये दर ८ ते १० मिनीटांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांना किती समजले याचा आढावा घेता येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी इंदापूर येथील 'इंदापूर महाविद्यालय पहिले ठरले आहे. 

पुणे : ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी लगबग सुरू झालेली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले इंदापूर महाविद्यालय डिजीटल महाविद्यालय म्हणून समोर आले आहे. पुणे विद्यापीठाने तयार केलेल्या ऑनलाईन व्यासपीठाचा सर्व प्रथम उपयोग करून येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरूवात केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लाॅकडाऊनमुळे महाविद्यालय सुरू कसे करायचे यावरून याचे आव्हान विद्यापीठ, महाविद्यालयांसमोर आहे. झूम वगैरे अ‍ॅपमुळे ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आल्या. त्यामुळे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शिक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये यासाठी खास 'लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम' विकसीत करण्यात आली. 

Image may contain: one or more people, people sitting, people standing and indoor

प्राध्यापकांनी व्हिडिओ तयार केल्यानंतर पुणे विद्यापीठातील अद्ययावत स्टुडिओमध्ये ते व्हिडिओ एडीट करून ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशनचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओमध्ये दर ८ ते १० मिनीटांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांना किती समजले याचा आढावा घेता येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी इंदापूर येथील 'इंदापूर महाविद्यालय पहिले ठरले आहे. 

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

आठवड्याभरात २० तास शिक्षण घ्यावे
विद्यापीठाने तयार केलेल्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी लाॅगईन करावे, त्यांनी त्यांच्या सवडीने रोज तीन तास किंवा आठवड्यातून १८ ते २० तासाचे शिक्षण पूर्ण करने करने अपेक्षित आहे.

काय केले इंदापूर महाविद्यालयाने ? 
इंदापूर महाविद्यालयाने ३७  प्राध्यापकांना व्हिडिओ तयार कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले आहे. फळ्यावर लिहीताना, पाॅवर प्वाईंट प्रेझेंटेशनचा वापर करून, केवळ मजकूर व त्या मागे प्राध्यापक शिकवतानाचा आवाज यासह इतर प्रकारे व्हिडिओ तयार केले. बीए, बीकॉम, बीएससी,  बीबीए पदवी अभ्यासक्रमासह पदव्युत्तर पदवीच्या प्रत्येक वर्गातील ७ ते ८ मुलांना यात सहभागी करून घेत त्यांच्याकडून फीडबॅक घेण्यात आला, त्यानुसार शिकवण्याच्या, व्हिडिओत बदल केला आहे. महाविद्यालयाने  आता महाविद्यालयाने स्वतःचा स्टुडिओ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, "नव्या शिक्षण पद्धतीचा प्रयोग करण्यास आमच्या महाविद्यालयाला संधी मिळाली, त्यानुसार प्राध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाॅगईन आयडी दिला आहे. विद्यापीठाने हे साॅफ्टवेअर मोफत उपलब्ध करून दिल्याने इतर महाविद्यालयांनी पुढे यावे."

महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या - ३०००
विद्यार्थीनी -१२००
प्राध्यापक - ३७
तयार केलेले व्हिडिओ - ५० पेक्षा जास्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur College affiliated to Pune University became digital