हर्षवर्धन पाटील म्हणतात, "थांबा आणि पाहा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

आठवडाभर राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (ता. 7) रात्री इंदापूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. तीन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेल्या पाटील यांच्या आगमनामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, कॉंग्रेसमध्ये राहणार की, भाजपमध्ये जाणार याची चर्चा शहरात ठिकठिकाणी रंगली होती. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी "थांबा आणि पहा' असे वक्तव्य केले.

इंदापूर (पुणे) : आठवडाभर राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (ता. 7) रात्री इंदापूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. तीन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेल्या पाटील यांच्या आगमनामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, कॉंग्रेसमध्ये राहणार की, भाजपमध्ये जाणार याची चर्चा शहरात ठिकठिकाणी रंगली होती. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक मौन बाळगत "थांबा आणि पहा' असे वक्तव्य केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या गणेश आरत्यामधून जनसंपर्काची फेरी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील हे जावेद शेख यांच्यासमवेत दुचाकीवर सर्वत्र फिरले. नरसिंह प्रासादिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव संभूदास, राकेश धारूरकर, अशोक चिंचकर, आशू मेहता, हर्शल गवळी, गौरव गानबोटे,श्रीमंत शिवराज मंडळाचे अध्यक्ष विकी पवार, भावेश ओसवाल, संदीप वाशिंबेकर यांनी त्यांचे स्वागत केले. नेहरू चौकात भाजपचे मेहबूब मोमीन, सिकंदर बागवान, चॉंद पठाण, मुन्ना बागवान यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले.

कॉंग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य शकील सय्यद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन सहकारी बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, संचालक दादासाहेब पिसे, कॉंग्रेसचे नगरपरिषद गटनेते कैलास कदम, शहराध्यक्ष बापूसाहेब जामदार, माजी शहराध्यक्ष गोरख शिंदे, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक शेखर पाटील, जावेद शेख, नितीन मखरे यांच्या समवेत हर्षवर्धन पाटील यांनी राजेवलीनगर येथून आरतीस सुरवात केली. त्यानंतर श्रीराम चौक, पोरापोरांची चावडी, कासारपट्टा, नेहरू चौक, अखिल मंडई करत शहरातील विविध गणेशोत्सव मंडळास भेटी देऊन आरत्या केल्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Congress & NCP Alliance