इंदापूरचा दुष्काळ हटणार - दत्तात्रेय भरणे

dattatray bharne
dattatray bharne

वालचंदनगर - नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाच्या निर्णयामुळे इंदापूर, बारामती व पुरंदर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणीवाटपाचा निणर्याचा सर्वाधिक फायदा इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे इंदापूर व बारामती तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाले होते.

इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मार्चनंतर सुरू होणाऱ्या ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार होते. इंदापूर तालुक्‍यातील ४६ क्रमांकाच्या वितरिकेच्या खालील २२ गावातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाणी मिळण्याची शास्वती नसल्याने हजारो एकर क्षेत्रावरील पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. कालव्याचे पाणी मिळणार नसल्यामुळे शेतकरी पीकपद्धती बदलण्याच्या विचारामध्ये होते. भरणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून नीरा डाव्या व उजव्या कालव्याच्या पाण्याचा समतोल राखण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. भरणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

नीरा डाव्या कालव्याला ५५ टक्के  व उजव्या कालव्याला ४५ टक्के पाणी उपलब्ध होणार असल्याने उन्हाळ्यामध्ये नीरा डाव्या कालव्याला सुमारे ५ टीएमसी वाढीव पाणीसाठा मिळणार आहे. नीरा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्‍यांचा समावेश आहे. ३७ हजार ७० हेक्‍टर क्षेत्र आहे. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील सर्वाधिक जास्त क्षेत्र असून तालुक्‍यातील २२ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न आहे.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मुबलक पाण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्‍यातील विशेषत: २२ गावांतील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये मुबलक पाणी मिळणार आहे.
- नंदकुमार रणवरे, माजी उपसरपंच, निमसाखर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com