
संजय महादेव गोरवे (वय २३, रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर ) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. मृत युवकाचे धारदार हत्याराने हात, पाय, डोके तोडून धड नदीपात्रात टाकण्यात आले होते.
इंदापूर - गणेशवाडी - बावडा (ता. इंदापूर) येथे भीमा नदीच्या गारअकोले पुलाजवळील नदी पात्रात संजय महादेव गोरवे (वय २३, रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर ) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. मृत युवकाचे धारदार हत्याराने हात, पाय, डोके तोडून धड नदीपात्रात टाकण्यात आले होते. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात मृताची आई मंजूषा महादेव गोरवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ४ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यापैकी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.
हेही वाचा : संकट आलं पण काम थांबलं नाही; सीरममध्ये कर्मचारी आले कामावर, लशीची खेपही रवाना
मृत संजय गोरवे याचे नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी दादा कांबळे (रा. बावडा), विकी ऊर्फ व्यंकटेश भोसले, महेश ऊर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे (रा. टाकळी, ता. माढा ) तसेच एका अल्पवयीन आरोपीस होता. त्यातून दि. १७ जानेवारी रोजी सर्व आरोपींनी संगनमत करून संजयला दादा कांबळे यांच्या घरी जेवण्यास बोलावले. त्यानंतर गणेशवाडी - बावडा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रालगत मोटार सायकलने येऊन आरोपींनी दबा धरला. संजय तेथे येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचे हात, पाय व धड वेगळे करण्यात आले. पोलिस निरीक्षक सारंगकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित जाधव, दाजी देठे व पोलिस सहकाऱ्यांनी भीमा नदी पात्रालगत जावून संजय गोरवे याचे पार्थिव ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.