इंदापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कंदील आंदोलन

इंदापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कंदील आंदोलन

इंदापूर - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण कंपनी प्रांगणात वाढत्या भारनियमनाच्या निषेधार्थ तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, शहराध्यक्ष अनिल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अरबाज शेख, कंदिल धरलेले आयुब शेख यांच्यासह अनेकांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ गोफणे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. 

महारूद्र पाटील म्हणाले, सध्या विहिरीत पाणी आहे, मात्र भारनियमनामुळे उभ्या पिकांना पाणी देता येत नाही. अच्छे दिनचे दाखवलेले एकही स्वप्न सरकारने पुर्ण केले नाही. आरक्षण नाही. बॅंकांना कोट्यावधी रूपयांचा चुना लावणा-यांवर सरकार कारवाई करत नाही मात्र शेतक-यांना कर्जमाफी घोषीत करूनसुध्दा कर्जमाफी देत नाही. त्यामुळे सर्व आघाडीवर अपयशी ठरलेल्या सरकारला सत्तेवर रहाण्याचा अधिकारनाही. 

माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे म्हणाले, भारनियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापा-यांचे ऐन सणासुदी व परिक्षेच्या काळात अतोनात 
नुकसान होत असून हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. नगरसेवक श्रीधर बाब्रस म्हणाले, नवरात्र महोत्सव सुरू असताना शासन आठ तास भारनियमन करत आहे.

हे चुकीचे आहे. शासनाने भारनियमन रद्द न केल्यास तीव्र आंदोलने छेडले जाईल. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल मोहिते, तालुकाध्यक्ष पवार, शहराध्यक्ष अरबाज शेख, विद्यार्थी राष्ट्रवादी युवक 
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर मोरे यांची भाषणे झाली. यावेळी सुधीर मखरे, तुषार घाडगे, महादेव लोखंडे, डॉ. संजीव लोंढे, राजेंद्र गोलांडे 
उपस्थित होते. 

महारूद्र पाटील हे जनतेच्या प्रश्नावर सरकारच्या विरोधात आंदोलन करतात. मात्र पक्षाचे मोठे नेते, पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते आंदोलनाकडे पाठ फिरवतात. तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत धुसफुस आहे. त्याचे देखील प्रतिबिंब आजच्या आंदोलन उपस्थितीत दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com