अवैध वाळू उपशावर इंदापूर पोलीसांची कारवाई, ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर तालुक्यातील शहा गावच्या हद्दीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करत इंदापूर पोलीसांनी ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Crime
Crimesakal
Summary

इंदापूर तालुक्यातील शहा गावच्या हद्दीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करत इंदापूर पोलीसांनी ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील शहा गावच्या हद्दीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करत इंदापूर पोलीसांनी ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून झालेल्या कारवाईत पोलीसांनी मूळ झारखंड येथील मात्र सध्या वांगी (ता. करमाळा) येथील तीन जणांना अटक केली. दि. ६ जून रोजी सकाळी दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. रात्री अकरा वाजून १४ मिनिटांनी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी पोलीसांनी कारवाईत एक फायबर बोट, एक सक्शन बोट तसेच ३२ हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू, हे गौण खनिज जप्त केले. असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीसनिरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.

पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना खबऱ्या कडून मौजे शहा येथील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. पाडुळे, पोलीस नाईक मनोज गायकवाड, पोलीस शिपाई श्री. केसकर व श्री. शिंगाडे यांना या बोटीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या पथकाने बोटीवर कारवाई करून रफिकुल सैफुद्दीन शेख, नवाब सरीफ इसुफ शेख, तारिकल इस्लाम हराजुल शेख, मोहमद यांना ताब्यात घेतले.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.

पोलीसांनी अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करून बोटीवरील कामगारांना अटक केली. मात्र, या बोटीचे मालक मात्र कारवाई पासून दूर आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अवैध वाळू उपसा बंद होणार नाही. अशी चर्चा परिसरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com