पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केली कमी खर्चातील शौचालयाची निर्मिती

राजकुमार थोरात
गुरुवार, 22 मार्च 2018

वालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नारळाच्या फांद्या वापरुन कमी खर्चामध्ये शौचालयाची निर्मिती केली अाहे. 

ग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक तयार शौचालय विकत घेऊन वापरत आहेत. शौचालय तयार करताना सिमेंट, स्टील, खडीचा वापर केला जातो. सध्या बारा ते तेरा हजार रुपये किमतीची शौचालये बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

कळंब येथील बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकमधील सिव्हिल  इंजिनअरिंगच्या सागर जाधव, विराज धुमाळ, प्रमोद काळे, श्‍यामल मोरे या विद्यार्थ्यांनी शौचालये बनविताना स्टीलऐवजी नाराळाच्या फांद्याचाचा वापर केला आहे. यामुळे शौचालयाची किंमत कमी झाली असून सहा हजार रुपयांमध्ये शौचालय तयार झाले आहे.

शौचालयाची निर्मिती करण्यासाठी पाॅलिटेक्निकमधील शिक्षिका प्राची निर्मल, विकास निर्मल यांनी विद्यार्थ्यांना मदत केली. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य के. बी. गवळी यांनी कमी खर्चामध्ये शौचालयाची निर्मिती केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

ना नफा,ना तोटा या संकल्पनेवरती शौचालयाची विक्री करणार : गवळी
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना बारा ते तेरा हजार रुपये खर्च करुन शौचालय विकत घेेणे परवडत नाही. प्रत्येक गाव हागणदारी मुक्त होण्यासाठी फडतरे नॉलेज सिटीच्या माध्यमातून सहा हजार रुपये किंमतीच्या शौचालयाची ना नफा ना तोटा या संकल्पनेवरती  मास प्रॉडक्शन करण्यास सुरवात करणार असल्याचे पॉलिटेक्निकचे प्राचार्य के.बी.गवळी यांनी सांगितले.

Web Title: Indapur polytechnic students develop low cost toilets