esakal | Indapur: शेतजमीनीच्या भांडणात शेखर पाटलांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

इंदापूर : शेतजमीनीच्या भांडणात शेखर पाटलांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १, माळवाडी हद्दीत दि. ३० सप्टेंबर रोजीदुपारी ३ वाजता शेतजमीन मालकीच्या कारणावरून इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शेखर पाटील यांनी सेवानिवृत्त शिक्षक भानुदास सातपुते यांच्या दिशेने गोळीबार केला. हा गोळीबार स्वसंरक्षणार्थ केल्याचे श्री पाटील यांचे म्हणणे आहे तर गोळीबार आपणास जीवे मारण्यासाठी झाल्याचे श्री सातपुते यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात रात्री उशिरादोघांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासकामी पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांना सूचना दिल्या.

हेही वाचा: तळेगाव ढमढेरे : आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण

भानुदास सातपुते ( रा. सातपुतेवस्ती, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीनुसार माजीनगरसेवक शेखर पाटील (रा. सोनाईनगर, इंदापूर) हे आपण व गणेश मेघशाम पाटील आपापसात जमिनीची वाटणी करत असताना तेथे आले. त्यांनी ही जमीन माझी असल्याचे सांगत आम्हाला शिवीगाळ व दमदाटी केली. मी प्रतिकार केला असता त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत आपल्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. गोळी आपल्या कानाजवळूनगेल्याने आपण थोडक्यात बचावलो.तर शेखर पाटील यांनी भानुदास सातपुते व इतर तीन जण गलांडवाडी नं. १ येथील श्री. स्वामी समर्थ इंटरलॉकिंग सिमेंट विट या आपल्या दुकानात आले. त्यांनी पेव्हर ब्लॉक फेकून दिल्याने त्याचा जाब विचारला असता ही जमीन आमची असल्याचे सांगत सातपुते व इतरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच गळ्यातील ८ तोळ्याची सोन्याची चैन व शर्टच्या खिशातील १० हजार रोख रक्कम लुबाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी अद्याप कोणाला अटक नसून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान हे प्रकरण सामोपचाराने मिटावे म्हणून काहींनी प्रयत्न सुरू केले तर काहींनी पोलीसांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे याचा शेवट कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top