इंदापुरातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल

डाॅ. संदेश शहा
Wednesday, 29 July 2020

इंदापूर तालुक्यातील ९४ पैकी ३५ शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून, तालुक्याचा सरासरी निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. तालुक्यातून परीक्षेस बसलेल्या ६२०१ विद्यार्थ्यांपैकी ५९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील ९४ पैकी ३५ शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून, तालुक्याचा सरासरी निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. तालुक्यातून परीक्षेस बसलेल्या ६२०१ विद्यार्थ्यांपैकी ५९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी २७९१ विद्यार्थी उच्च श्रेणी, २१२५ विद्यार्थी ग्रेड १,९२० विद्यार्थी ग्रेड २, तर १६३ विद्यार्थी पास ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, इंजिनिअर व शिक्षक होण्याकडे कल असल्याचे सांगितले.  

राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे

१०० टक्के निकाल लागेली विद्यालये पुढीलप्रमाणे : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रेडणी, भारत चिल्ड्रन अकॅडमी वालचंदनगर, श्री छत्रपती इंग्लिश मिडीअम स्कूल व गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय भवानीनगर, वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी. माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली, श्रीराम विद्यालय भोडणी, माध्यमिक विद्यालय म्हसोबावाडी, माध्यमिक विद्यालय तावशी, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय लाखेवाडी, प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर, गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतोंडी, कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली, उदमाई विद्यालय घोलपवाडी, श्री हनुमान विद्यालय सुरवड, नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन, कै. शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय शहाजीनगर- रेडा, अंकलेश्वर माध्यमिक विद्यालय अकोले, लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे, माध्यमिक विद्यालय गिरवी- पिंपरी, श्री काळभैरव विद्यालय कळाशी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळा इंदापूर, आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण, श्री छत्रपती हायस्कूल परिटवाडी, विठ्ठलराव थोरात माध्यमिक विद्यालय भिगवण, विद्या प्रतिष्ठानचे इंदापूर इंग्लिश मिडीअम स्कूल इंदापूर, शिवपार्वती इंग्लिश मिडीअम स्कूल नीरा नरसिंहपूर, एल. जी. बनसुडे विद्यालय पळसदेव. श्री नागेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल शेटफळगढे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांचे शासकीय विद्यालय, जिजामाता इंग्लीश मिडीअम स्कूल सराटी, डॉ. कदम जीवन विकास प्रशाला व गुरूकुल विद्या मंदिर इंदापूर, श्री. नारायणदास रामदास इंग्लिश मिडीअम स्कूल इंदापूर, तुळजाभवानी इंग्लीश मिडीअम स्कूल.

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

इतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे : श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी (९९.५३), नागेश्वर विद्यालय शेटफळगढे (९९.०८), चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर (९८.९२), श्री बाबीर विद्यालय रुई (९८.९०), श्री काटेश्वर विद्यालय काटी (९८.८२), श्री छत्रपती हायस्कूल बेलवाडी (९८.५०), श्री छत्रपती हायस्कूल सणसर (९८.३०), न्यू इंग्लिश स्कूल डाळज (९८.१८), महात्मा फुले विद्यालय वरकुटे खुर्द (९८.०३), अनंतराव पवार विद्यालय निरवांगी (९७.६१) डॅफोडील्स इंग्लिश मिडिअम आनंदनगर (९७.५६), निमसाखर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल निमसाखर (९७.५३), श्री शिवाजी विद्यालय ज्युनिअर कॉलेज बावडा (९७.५०), लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालय पिंपरी बुद्रुक (९७.४३), राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर (९७.३३), न्यू इंग्लिश स्कूल लाकडी (९७.२२), कमल विद्यालय बाभुळगाव (९७.१४), वालचंद विद्यालय कळंब (९७.००), माध्यमिक विद्यालय भांडगाव (९६.८७), कोंडीराम सदाशिव क्षीरसागर माध्यमिक विद्यालय भिगवण (९६.५५), माध्यमिक विद्यालय बोराटवाडी (९६.२२), भैरवनाथ विद्यालय भिगवण (९६.२१), श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगांव (९६.००), श्री छत्रपती गर्ल्स हायस्कूल भवानीनगर (९६.००), शामभाऊ महादेव विद्यालय दगडवाडी (९५.९१), श्री बोरी हायस्कूल बोरी (९५.९१), श्री हनुमान विद्यालय अवसरी (९५.८३), शिवाजी विद्यालय वरकुटे बुद्रुक (९५.७७), श्री हरणेश्वर विद्यालय कळस (९५.२३), महात्मा फुले विद्यालय निमगाव केतकी (९५.००), वर्धमान विद्यालय वालचंदनगर (९४.५५), श्री पळसनाथ सेकंडरी विद्यालय पळसदेव (९४.९५), रणगांव हायस्कूल रणगांव (९४.७३), उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर १ (९४.७३), सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला अंथुर्णे (९३.९३), श्री नानासाहेब व्यवहारे पिंपरी खुर्द (९३.०२),  श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर (९२.९६), श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल अंथुर्णे (९२:३०), महात्मा फुले विद्यालय फुलेनगर, बिजवडी (९२.३०), श्रीछत्रपती हायस्कूल उद्धट (९२.३०), प्रगती विद्यालय लोणी देवकर (९१.८३), समाजरत्न शिवाजीराव शेंडगे विद्यालय, तरंगवाडी (९१:३०), दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव (८९.०६), नुतन माध्यमिक विद्यालय कौठळी (८९.१३), सौ. कस्तुराबाई कदम विद्यालय इंदापूर (८९.१०), श्री छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी (७८.२६).

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुकुंद शहा, डॉ. लहू कदम, अरविंद वाघ, रत्नाकर मखरे, ज्योती जगताप, विकास फलफले, रवी काकडे आदींनी अभिनंदन केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur taluka's 10th result is 97 percent