esakal | लासुर्णेचे उड्डानपुल रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी | Indapur
sakal

बोलून बातमी शोधा

लासुर्णे गावच्या हद्दीतील उड्डान पुल रद्द करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देताना लासुर्णे गावचे ग्रामस्थ.

Indapur : लासुर्णेचे उड्डानपुल रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी

sakal_logo
By
राजकुमार थोरात

इंदापूर : गावच्या हद्दीतील नियोजित संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रस्त्यावरील उड्डान पुलांना लासुर्णे ग्रामस्थांनी विरोध केला असून उड्डान पूल रद्द करण्याची मागणी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामास सुरवात झाली आहे. लासुर्णे गावातील चिखली फाटा, बोरी चौक, व लासुर्णे गावामध्ये उड्डान पुल करण्याचे नियोजन आहे. सदर ठिकाणी उड्डान पुल झाल्यास याचा लासुर्णे गावच्या विकास व व्यवसायावरती दुरगामी परीणाम होणार असल्याने उड्डान पुल रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा: वॉर्डाचा विकास करा किंवा माझ्यावर अंत्यसंस्कार करा!

यासंदर्भातील निवेदन आज शनिवारी (ता.९) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब सपकळ, सरपंच सागर पाटील,उपसरपंच उल्हास जाचक, तेजसिंह पाटील, डॉ.योगेश पाटील, मनोज कुलकर्णी, अंकुश जामदार, निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य निखील भोसले, संतोष लोंढे, विशाल घाेरपडे, दिपक लोंढे, अमित चव्हाण, सचिन खरवडे उपस्थित होते.

loading image
go to top