esakal | इंदापूर महिला दक्षता समितीवर डॉ. धनश्री भिसे व अनिता खरात यांची निवड.
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

इंदापूर महिला दक्षता समितीवर डॉ. धनश्री भिसे व अनिता खरात यांची निवड.

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत महिला दक्षता समितीवर राजमाता प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. धनश्री अमोल भिसे व तेजपृथ्वी ग्रुप च्या अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात यांची निवड करण्यात आली. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर व महिला पोलीस हवालदार माधुरी लडकत यांनी ही माहिती दिली.

या समितीवर सहेली महिला बचत गटाच्या अध्यक्षा सायरा आतार, विकासधारा मंचच्या अध्यक्षा सीमा कल्याणकर, अंगणवाडीसेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा बकुळाशेंडे,संजीवनी ट्रस्टच्या संचालिका वृषाली निंबाळकर, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया कोळेकर व जयश्री जाधव यांच्यासमवेत डॉ. भिसे व अनिता खरात या काम पाहणार आहेत.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

यावेळी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर म्हणाले, अल्पवयीन मुला मुलींच्या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत सरासरी रोज एक तक्रार येत असून त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यांना भविष्याचीजाणीवकरून देणे गरजेचे आहे. त्यांचा स्मार्ट मोबाईल वापर शैक्षणिक कार्यासाठी करणे गरजेचे आहे. या संदर्भातील गुन्ह्यांना शंभर टक्के प्रतिबंध होण्यासाठी पोलीस, दक्षता समिती व पालकांनी योग्य समन्वय ठेवून कामकरणे गरजेचे आहे.

यावेळी बकुळा शेंडे म्हणाल्या, गेली २१ वर्षापासून इंदापूर शहर व ग्रामीण मधील महिलांचे प्रश्न आम्ही दक्षतासमितीच्यामाध्यमा तून सोडवत असून त्यास पोलीस ठाण्याचे चांगले सहकार्य मिळत आहे. सायरा आतार म्हणाल्या, दक्षता समितीच्या माध्यमातून अनेक जणांचे संसार सुरळीत करण्यास यश मिळाले आहे.

loading image
go to top