'इंडिया अगेन्स्ट हेट्रेड' चळवळीला क्रांतिदिनी प्रारंभ; १ लाख 'शांती सैनिक' जोडले जाणार

India against hatred
India against hatred

पुणे : संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश दिला. हाच संदेश भारतभरात प्रस्थापित व्हावा, यासाठी रविवारी (ता.९) आळंदीत त्यांच्या समाधीस्थळी क्रांतिदिनाच्या निमित्तानं भारताच्या द्वेषाविरोधाच्या लढाईस (इंडिया अगेन्स्ट हेट्रेड) या चळवळीला प्रारंभ झाला. 

द्वेषाविरुद्धची लढाई लढण्यासाठी १ लाख ‘शांती सैनिक’ शांतीचा संदेश तेवत ठेवण्याचं काम करणार असून रविवारी त्याचा पुण्यासह कर्नाटक, काश्मीर, पंजाब, अलाहाबाद, आसाम या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती या चळवळीचे राष्ट्रीय समन्वयक नीलेश नवलाखा यांनी दिली.

त्यावेळी डॉ. अमोल देवळेकर, सचिन शिंगवी, नितीन मेमाणे, संदीप माचुत्रे, विकास सोनताटे, सत्यम सोनावणे, ॲड. राजेश इनामदार, आर्किटेक्ट इमरान शेख उपस्थित होते. पुणे स्टेशनजवळील महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच पुण्यातील सातारा रस्त्यावर स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळही या चळवळीचा प्रतीकात्मक प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ॲड. चंद्रकांत घाणेकर, अनिल शिंदे, राजेंद्र जगताप, बाळासाहेब मसुरकर, सुनील बिवबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवलाखा म्हणाले, 'ही कोणत्याही पक्षाविरोधी, व्यक्तीविरोधी अथवा धर्माविरोधातील चळवळ नाही. पूर्णतः अराजकीय स्वरूप असलेली ही चळवळ कोणत्याही पद्धतीच्या द्वेषाविरोधात सनदशीर मार्गानं लढा देणार आहे.'

'समाजमाध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या द्वेषाविरोधातही या चळवळीच्या माध्यमातून लढा देण्यात येणार आहे. उपलब्ध कायद्यांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, प्रसंगी न्यायालयीन लढाईही लढण्यात येईल,' असे ॲड. राजेश इनामदार यांनी सांगितले.

या चळवळीला भारतातल्या अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. आसाममध्ये गेल्या १० वर्षांपासून ऑल बोडो स्टुंडंट युनियनचे अध्यक्ष प्रमोद बोडो, माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी या चळवळीस समाजानं पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही द्वेषा विरुद्धची लढाई दीर्घकालीन असून यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. 

या चळवळीतून १ लाख शांती सैनिक जोडले जाणार असून त्या सैनिकांना सरहद संस्थेची ‘गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी’ प्रशिक्षण देणार आहे. या संदर्भातील माहिती www.india-against-hatred.com या वेबाईटवर उपलब्ध असून ‘India against hatred’ या नावाने फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलही सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या या चळवळीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. देवळेकर यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com