जाणून घ्या भारतीय उत्सवांचे मर्म!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

भारतीय उत्सवांची योजना, त्यामागचे मर्म व त्यातून होणारा फायदा समजावा यादृष्टीने येत्या शनिवारपासून तीन सत्रीय वेबिनार आयोजित  करण्यात येत आहे.

पुणे - आरोग्य, प्रतिकारशक्ती आणि ताकद यांची सध्या आपणा सर्वांना आवश्‍यकता आहे. जीवन जगण्यासाठी आपल्याला काम करायला हवे, पैसे हवेत. पण, नेमकी याचीच आज कमतरता आहे. भारतीय संस्कृतीने, यासारख्या अडचणी येऊ नयेत यासाठी, आणि आल्या तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी उत्सवांची योजना केलेली आहे. त्यातील पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रापासून भाऊबीजेपर्यंत चालणारा उत्सव. उत्सवांमागचे मर्म जर आपण समजून घेतले आणि त्याप्रमाणे उत्सव साजरा केला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. भारतीय उत्सवांची योजना, त्यामागचे मर्म व त्यातून होणारा फायदा समजावा यादृष्टीने येत्या शनिवारपासून तीन सत्रीय वेबिनार आयोजित  करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे हे या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. नवरात्री, दसरा, कोजागरी पौर्णिमा आणि सर्वांत महत्त्वाचा दीपावली उत्सव कसा साजरा करावा? या संपूर्ण उत्सव-कालाचा उपयोग विकास, शक्ती व समृद्धी वाढण्यासाठी कसा करावा? या सर्व प्रथा-परंपरांमागचे नेमके विज्ञान काय आहे अशा अनेक विषयांवर श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे मार्गदर्शन  करणार आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येत्या शनिवारपासून या त्रिसत्रीय वेबिनारची सुरुवात होणार आहे. तिन्ही वेबिनार संध्याकाळी ५ ते ६ः३० या वेळेत असतील. मार्गदर्शनाची भाषा हिंदी असेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्र : १ 
शनिवार, २४ ऑक्‍टोबर २०२०
  नवरात्री, दसरा, कोजागरी

सत्र : २
शनिवार, ३१ ऑक्‍टोबर २०२०
  वसुबारस, धनत्रयोदशी
    आणि नरकचतुर्दशी

सत्र : ३
शनिवार, ०७ नोव्हेंबर २०२०
  लक्ष्मीपूजन, नववर्षदिन
    (पाडवा), भाऊबीज

संपूर्ण वेबिनारसाठी (तिन्ही सत्र) ६५० रुपये, तर कुठल्याही एका सत्रासाठी २५० रुपये भरून आपण यात सहभागी होऊ शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९६८९९ २६००२
ई-मेल : Lifeinbalance@santulan.in


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India festival three-part webinar will start from Saturday