अमेरिकेतून आज येणार दोन हॉवित्झर तोफा

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

भारताने थेट अमेरिकन सरकारशीच या 145 हॉवित्झर तोफा खरेदीचा  700 मिलियन अमेरिकन डॉलरचा करार केला आहे. या करारानुसार पहिल्या 25 तोफा थेट अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार असून उर्वरित तोफा भारतात तयार करण्यात येणार आहेत

नवी दिल्ली : अमेरिकेतून दोन 145 मि.मी. लाइट हॉवित्झर तोफा भारतात येणार असून, भारतीय लष्कराला बोफर्स प्रकरणानंतर 30 वर्षांनी या तोफा मिळणार आहेत.

या बोफर्स प्रकरणाचा लष्कराच्या आधुनिकीकरणावर अत्यंत वाईट परिणाम झाला होता. या आठवड्यात पहिल्या दोन तोफा भारतात दाखल होणार असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय लष्करासाठी या होवित्झर तोफा खरेदी करण्यात येत असून त्या भारत चीन सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.

भारताने थेट अमेरिकन सरकारशीच या 145 हॉवित्झर तोफा खरेदीचा 700 मिलियन अमेरिकन डॉलरचा करार केला आहे. या करारानुसार पहिल्या 25 तोफा थेट अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार असून उर्वरित तोफा भारतात तयार करण्यात येणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: India gets new howitzers