घराबाहेर मृत गाय सापडल्याने मारहाण; घर पेटवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

घराच्या बाहेर मृत गाय सापडल्याने घरातील एकाला जमावाने मारहाण करून घर पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रांची (झारखंड) : घराच्या बाहेर मृत गाय सापडल्याने घरातील एकाला जमावाने मारहाण करून घर पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रांचीपासून 200 किलोमीटर अंतरावरील एका गावात हा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. गावातील अन्सारी नावाच्या व्यक्तीच्या घराबाहेर मृत गाय आढळून आली. त्यानंतर जमावाने ज्या घराबाहेर गाय आढळून आली त्या घरात घुसून अन्सारीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घर पेटवून दिले. दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले. जमाव दगडफेक करू लागला. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मात्र पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यानंतर घटनास्थळी 50 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आली. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी आरके मुलीक यांनी माहिती दिली. या प्रकरणी पंधरा जणांची चौकशी करण्यात आली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. अन्सारी यांना धनबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: india news national news rachi news dead cow found