मान ताठ ठेवूनच चीनशी चर्चा करावी : एअर मार्शल गोखले

मान ताठ ठेवूनच चीनशी चर्चा करावी : एअर मार्शल गोखले
मान ताठ ठेवूनच चीनशी चर्चा करावी : एअर मार्शल गोखले

पुणे - "युद्ध कोणालाच नको असले; तरी चीनसंदर्भात अखंड सावध धोरण राबविण्याची आवश्‍यकता असल्याचे,' मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. भूतान-भारत-चीन ट्रायजंक्‍शन येथे चीनकडून करण्यात आलेल्या घुसखोरीवरुन दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सकाळकडून आयोजित करण्यात आलेल्या "फेसबुक लाईव्ह' मुलाखतीमध्ये गोखले यांनी यासंदर्भातील भूमिका मांडली.

गोखले म्हणाले -

  • सिलिगुडी येथील "चिकन नेक' जवळच हे ट्रायजंक्‍शन आहे. यामुळे व्यूहात्मक दृष्टया हा भाग अत्यंत संवेदनशील आहे.
  • प्रत्येक देशास सीमारेषा (बॉर्डर) व फ्रंटियर्स असतात. चीनकडून "मिडल किंग्डम'ची भाषा सतत करण्यात येत असते. मंगोलिया, दक्षिण चिनी समुद्र या चीनच्या दृष्टिकोनामधून फ्रंटियर्स आहेत. माओच्या "पाच फिंगर्स' वचनानुसार चीनचे धोरण राबविण्यात येत आहे. चीनचे हे धोरण लक्षात घेऊनच भारतीय धोरण राबविण्याची आवश्‍यकता आहे.
  • चीनकडून सतत 62 च्या युद्धाची आठवण करुन देण्यात येते. मात्र या युद्धात भारतीय हवाईदल वापरण्यात आले नाही, ही अत्यंत दुदैवी बाब आहे. आता परिस्थिती वेगळी आहे. चीनच्या सीमारेषेजवळ सुखोई विमाने तैनात करण्यात आल्यानंतर चीनकडून आक्षेप घेण्यात आला. चीनला योग्य इशारा देण्याची क्षमता या विमानांमध्ये व पर्यायाने भारतीय हवाई दलामध्ये आहे.
  • "जीएसटी'मुळे चीनला फटका बसण्याची शक्‍यता आहे. व्यापारी माल भारतीय बाजारपेठेमध्ये "डम्प' करण्याच्या चीनच्या धोरणास जीएसटीच्या माध्यमामधून योग्य उत्तर देण्यात आले आहे. एकंदरच, जागतिक महासत्ता होण्याची आकांक्षा असल्यास चीनला परराष्ट्र धोरण बदलावे लागेल.
  • इस्राईलबरोबरील संबंध भारताच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील आहेत. भारतीय मुस्लिम समुदायाचा भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये कधीही हस्तक्षेप झालेला नाही, ही एक अत्यंत चांगली बाब आहे. भारताचे इस्राईलविषयक धोरणही पूर्णत: राष्ट्रीय हितावर आधारित आहे. त्याचा इस्राईलच्या धर्माशी वा अन्य अशा स्वरुपाच्या घटकाशी कसलाही संबंध नाही. इस्राईल व भारतामधील द्विपक्षीय संबंध अधिकाधिक विकसित करण्यास प्रचंड वाव आहे. विविध क्षेत्रांच्या विकासासंदर्भात भारत व इस्राईलमध्ये मोठी देवाणघेवाण होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com