भारतीय सैनिक सदैव तत्पर : गोखले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : ''भारतीय सैनिक हे नेहमी युद्ध किंवा प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे भारतीय सेनेला 'संरक्षण सेना' असे न म्हणता 'सशस्त्र सेना' असे म्हटले पाहिजे,'' असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले. 

'अध्ययन बुक्‍स'तर्फे कमलाकर गुणे लिखित 'ब्ल्यू स्काय कॉलिंग- टेल ऑफ लव्ह ऍण्ड पॅट्रियोटिझम' या पुस्तकाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. साहित्यिक डॉ. न. म. जोशी, लेखक अतुल कहाते उपस्थित होते. 

गोखले म्हणाले, ''लढाऊ विमानाच्या वैमानिकांच्या प्रेम कथा या पुस्तकाचा गाभा असला, तरीही लढाऊ विमानांनी शत्रूवर चढविलेल्या हल्ल्याची अनुभूतीही या पुस्तकातून येते. लष्काराविषयी माहिती देणारे साहित्य फारसे समोर येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लष्काराविषयी फारशी माहिती मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर सशस्त्र सेनेत काम केलेल्या अधिकाऱ्यांनी त्यावर लिखाण करत नागरिकांना सुजाण बनविणे आवश्‍यक आहे.'' 

कहाते म्हणाले, ''लढाई वैमानिकाचे आयुष्य हे थरारक, रोमांचक असते. मात्र अशा विषयांवर आपल्याकडे लिहिले जात नाही. समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्राविषयी लिखाण करणे आवश्‍यक आहे.'' डॉ. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुधाकर जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मोनिका जोशी, संजय पोतदार यांनी केले. 

Web Title: Indian Army is always ready to protect homeland says Air Marshal Bhushan Gokhale