कोरोनामुळे चीनच्या गाेंजाऊचे आर्थिक व्यवहार थंडावले; भारतीय उद्योजक चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना विषाणूचे थैमान कायम आहे. तेथील हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहान त्याचे केंद्रबिंदू आहे. दक्षिण चीनमधील गोंजाऊ शहर हे वुहानपासून 980 किलोमीटर दूर आहे. तेथे अजून कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. परंतु, खबदारी म्हणून चीन सरकारने सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. हॉंगकॉंग जवळील दक्षिण चीनमधील गोंजाऊ शहर देखील अपवाद राहिलेले नाही. या शहराला सुमारे दीड हजारांहून अधिक भारतीय उद्योजक आणि व्यावसायिक जोडले गेले आहेत. 
 

 पिंपरी : दक्षिण चीनमध्ये 'बिझनेस हब' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोंजाऊ शहराला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र, त्याच्या धास्तीने दररोज होणारे अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. सरकारी कार्यालये आणि शाळांच्या सुट्टया लांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे, तेथील भारतीय उद्योजक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 

une/pmc-decision-increase-water-tax-15-percent-480832" target="_blank">पुणेकरांना आता पाण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

Image may contain: one or more people and people standing

चीनमध्ये कोरोना विषाणूचे थैमान कायम आहे. तेथील हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहान त्याचे केंद्रबिंदू आहे. दक्षिण चीनमधील गोंजाऊ शहर हे वुहानपासून 980 किलोमीटर दूर आहे. तेथे अजून कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. परंतु, खबदारी म्हणून चीन सरकारने सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. हॉंगकॉंग जवळील दक्षिण चीनमधील गोंजाऊ शहर देखील अपवाद राहिलेले नाही. या शहराला सुमारे दीड हजारांहून अधिक भारतीय उद्योजक आणि व्यावसायिक जोडले गेले आहेत. 

प्लॅस्टिक बाटल्यांपासून साकारलं स्वप्नातलं घर

Image may contain: one or more people and people standing

मागील 12 वर्षांपासून गोंजाऊ आणि हॉंगकॉंगमध्ये व्यवसाय करणारे उद्योजक निश्‍चल मोरे म्हणाले,"माझा गोंजाऊमध्ये फर्निचर व गृहपयोगी वस्तूंची आयात-निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. मला माझ्या घराचे नूतनीकरण करायचे होते. त्यामुळे, मी पिंपरी-चिंचवडला आलो. त्यानंतर चीनमध्ये 2 महिन्यांनी कोरोना विषाणूचे संकट पसरले. गोंजाऊ हे जगभरात 'बिझनेस हब' म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईपेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेले हे शहर असून त्याच्या सभोवताली असंख्य उद्योगधंदे वसले आहेत. युरोपला जाणाऱ्या-येणाऱ्या आशियाई आणि ऑस्ट्रेलियाकडील विमान प्रवाशांसाठी हॉंगकॉंग हा "ट्रान्झिट स्टॉप' आहे. त्यांना तेथे उतरल्यावर खरेदी आणि पर्यटनासाठी काही दिवसांचा "अराईव्हल' व्हिसा मिळतो. तेथे आल्यावर हे प्रवासी गोंजाऊलाही भेट देतात. सध्या तेथील सरकारी कार्यालये आणि शाळा सुरु होण्याची अपेक्षा होती. मात्र, दक्षता घेण्यासाठी शाळांच्या सुट्टया लांबल्या आहेत. शहरातील जागतिक पातळीवरील व्यावसायिक प्रदर्शने रद्द करण्यात आली आहेत.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- चिनी नववर्षाच्या सुट्टीचा फायदा 
चीनच्या नवीन वर्षासाठी असंख्य कामगार त्यांच्या गावी जाऊन नववर्ष साजरे करतात. त्यांच्या अजून सुट्टया संपल्या नाहीत. त्यामुळे, हे कामगार शहरांकडे परतले नाहीत. या सुट्टयांच्या काळात कोरोनाचा उद्रेक झाला. हे सुदैवच आहे. अन्यथा कोरोना आणखी पसरला असता.'', असेही निश्‍चल मोरे यांनी सांगितले. 
 

#RingRoad रिंगरोडमधून मेट्रो शक्य

- कोरोनाचे चिनी उत्पादनांवरही दुष्परिणाम ! 
चीन सरकार लवकरच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवेल, असा आशावाद तेथील जनता व्यक्त करत आहे. मात्र, चीनमधील उद्योग-व्यवहारावर विपरीत परिणाम झाल्याने चिनी बनावटीच्या वस्तू महागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian businessmen worried over economic downturn of Gonzao from china due to corona