दुबईस्थित भारतीय डॉक्टरला पंढरीच्या वारीची ओढ, काळजी घेण्याचे आवाहन

पंढरीच्या वारीची आस काही वेगळीच असते, मनात इच्छा असूनही यावर्षी वारीला येवू न शकलेल्या दुबईस्थित भारतीय डॉक्टरला ओढ मात्र पंढरीच्या वारीची लागली आहे
Indian doctor in Dubai Pandhari Wari appeals to Warkaris via social media take care of covid19 pune
Indian doctor in Dubai Pandhari Wari appeals to Warkaris via social media take care of covid19 punesakal

कोरेगाव भीमा : पंढरीच्या वारीची आस काही वेगळीच असते, मनात इच्छा असूनही यावर्षी वारीला येवू न शकलेल्या दुबईस्थित भारतीय डॉक्टरला ओढ मात्र पंढरीच्या वारीची लागली आहे. प्रत्यक्ष येता आले नाही, तरीही समाजमाध्यमातून ते वारीत सहभागी होत असून वारीतील वारकऱ्यांनी कोविडसह आरोग्याबाबत काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी समाजमाध्यमाद्वारे केले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातूनही प्रत्यक्ष आरोग्यसेवेसह विविध घटकांचे आरोग्यप्रबोधन करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. खेळाडुंच्या फिटनेससाठी दुबई क्रिकेट बोर्डाच्या हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्टपदी कार्यरत असलेले डॉ.मनिष परदेशी हे सध्या परदेशात असले तरी त्यांना ओढ मात्र पंढरीच्या वारीची लागली आहे.

यंदा वारीत नसलो तरीही फेसबुकच्या माध्यमातून कोरोनाबाबत प्रबोधन करताना त्यांनी वारकऱ्यांनी मास्क वापरणे व हात धुणे यासह कोरोनानियमांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन वारकरी बांधवांना केले आहे. दरम्यान दरवर्षी वारकरी व सामान्यांची सेवा करणारे डॉ. मनिष परदेशी हे सध्या भारताबाहेर असले तरी त्यांच्या एमआर हेल्थ केअर ग्रुपच्या माध्यमातून सहकारी डॉ. सुरज नाईक व वैशाली पवार-भोसले यांच्या मदतीने सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देत आहेत. डॉ. परदेशी यांच्या पुढाकाराने वारीसह विविध ठिकाणी एमआर हेल्थ केअरच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आरोग्यतपासणीची सेवा सुरुच असल्याचे सांगून आजच शिरुर येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळांच्या शाळेतही आरोग्यतपासणी केल्याचे डॉ. सुरज नाईक व वैशाली पवार-भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com