‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न शकल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. ते येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये भरविण्यासाठी  पावले उचलली जातील, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. 

यानिमित्ताने विद्यापीठाच्या नियोजनातील ढिसाळपणा समोर आला आहे. विद्यापीठातील इतिहास विभागातर्फे येत्या २८ ते ३० डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन आयोजित केले होते. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन हजारांहून अधिक इतिहास संशोधक व अभ्यासक सहभागी होणार होते. त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. मात्र निधीची कमतरता आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अधिवेशनाला येणाऱ्या अभ्यासकांची राहण्याची सोय होऊ न शकल्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलले असल्याची माहिती इतिहास विभाग प्रमुख डॉ. राधिका सेशन यांनी दिली. परंतु आगामी काळात या अधिवेनशाचे काय नियोजन असेल, याबाबत अधिक माहिती देण्यास विद्यापीठाने टाळाटाळ केली. 
इतिहास विभागाने व्यवस्थित नियोजन आणि पाठपुरावा न केल्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याची चर्चा विद्यापीठात सुरू होती.

इंडियन हिस्टरी काँग्रेस पुणे विद्यापीठात होणे ही अभिमानाची बाब आहे. परंतु पुरेसा निधी उपलब्ध होऊ न शकल्याने हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Indian History Congress Session Pune University