पुण्यात मेडिकल शॉपमध्ये आढळली चक्क घोरपड!

Indian Monitor Lizard Found at Medical shop in Pune.jpg
Indian Monitor Lizard Found at Medical shop in Pune.jpg

पुणे : पुण्यात काही दिवसांपुर्वी दुचाकीच्या सीटखाली साप आढळला होता. आता, तर चक्क एक घोरपड आढळली आहे. एका मेडिकल शॉपमध्ये आज ही घोरपड आढळली असून, सर्पमित्रांनी घोरपड पकडली आहे.

धायरी परिसरातील शिवनेरी मेडिकलमध्ये अचानक अडीच ते तीन फुटाची घोरपड आढळली. मेडिकल दुकानदाराने सर्पमित्र अप्पा दुबल यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र अप्पा दुबल यांनी तातडीने याची दखल घेतली आणि घोरपडीला पकडले.'

 दरम्यान या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. साप, घोरपड सारखे प्राणी असे अचानक कसे काय आढळून येत आहेत याबाबत विचारले असता, सर्पमित्र सर्पमित्र अप्पा दुबल म्हणाले, ''मध्यंतरी पुण्यात आलेल्या पुरामुळे, पावसाच्या पाण्यामुळे सरपटणारे प्राणी साप, घोरपड प्रवाहासोबत वाहत बाहेर. कधी गाडीच्या सीटखाली साप आढळतो.  असे कोणतेही प्राणी आढळल्यास सर्पमित्र, प्राणीमित्रांना सांगा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com