सौदीत अडकलेल्यांसाठी अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांनी...  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन'अंतर्गत विमानसेवा सुरू केली. त्यानंतर सौदी अरेबियातील अनेक भारतीय नागरिक भारतात परतत असताना महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबई, नागपूर अथवा पुणे येथे येणारी फ्लाईट्स उपलब्ध नव्हते. त्यामुळे

पुणे : सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी चार्टर्ड विमानाला मुंबईत उतरण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून, या नागरिकांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

चार्टर्ड विमानाला मुंबईत उतरण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र मंडळ, सौदी अरेबियाचे अध्यक्ष मधुकर हडकर डॉ. कोल्हे यांना निवेदने पाठवून मदतीची विनंती केली होती. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारने सौदी अरेबियातून महाराष्ट्रातील नागरिकांना घेऊन येणाऱ्या चार्टर्ड विमानाला मुंबई व पुणे येथे उतरण्याची परवानगी द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेरीस अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने परवानगी दिली. परंतु, राज्य सरकारने परवानगी देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यास विलंब होत असल्याने उशीर होत होता. 

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

या संदर्भात डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व संपर्क साधला होता. त्यांच्या चिकाटीने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने अखेरीस आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सौदी अरेबियात अडकलेले महाराष्ट्रातील नागरिकांचा परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

हजारो भारतीय नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेले होते. मात्र, कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर या नागरिकांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना भारतात परतणे आवश्यक झाले होते. परंतु, लॉकडाउनमुळे विमानसेवा बंद असल्याने त्यांना भारतात परत येण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते.

दरम्यान, केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन'अंतर्गत विमानसेवा सुरू केली. त्यानंतर सौदी अरेबियातील अनेक भारतीय नागरिक भारतात परतत असताना महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबई, नागपूर अथवा पुणे येथे येणारी फ्लाईट्स उपलब्ध नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र मंडळ, सौदी अरेबिया या संघटनेचे अध्यक्ष मधुकर हडकर यांनी सर्व महाराष्ट्रीयन नागरिकांची एकजूट उभारून चार्टर्ड विमानाने येण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना डॉ. कोल्हे यांनी आवर्जून प्रतिसाद दिला आणि आपल्या बांधवांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी सातत्याने ई-मेल, फोन येत होते. सौदी अरेबियातील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर हडकर हेही सतत संपर्कात होते. तेथील महाराष्ट्रीयन बांधवांची मनोवस्था व अडचणी मी समजू शकत होतो. म्हणूनच मी त्यांच्यासाठी झटून एका मिशनप्रमाणे प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना यश आले, याचा आणि आता आपले बांधव घरी परत येतील याचा मला अतिशय आनंद झाला आहे.
 - डॉ. अमोल कोल्हे, खासदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian nationals stranded in Saudi Arabia Coming back to India, the efforts of Supriya Sule and Amol Kolhe