लोहगाव येथे आढळला मोठा इंडियन राॅक पायथन अजगर

अन्वर मोमीन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नागरीवस्ती जवळ हा अजगर आढळून आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. तो शेळी, कुत्रा किंवा मांजराच्या शिकारीसाठी आला असावा असा अंदाज आहे.

वडगाव शेरी (पुणे) : लोहगाव येथील गोठणवढा भागात मोठा अजगर आढळून आला. नागरीवस्ती जवळ हा अजगर आढळून आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. तो शेळी, कुत्रा किंवा मांजराच्या शिकारीसाठी आला असावा असा अंदाज आहे.

या ठिकाणचे नागरिक अतुल खांदवे, मयुर खांदवे यांनी सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी यांनी रात्री बारा वाजताच्या सुमारास बोलावून हा आठ फुटी अजगर पकडला. त्यानंतर आज वनविभागाचे अधिकारी विष्णू गायकवाड, हवालदार शितल फुंदे, वनरक्षक दया डोमो यांचे मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी लक्ष्मण टिंगरे यांचे समक्ष व सर्पमित्र सारंग देवकर, धनंजय जाधव, श्रीधर गायकवाड, गजानन टिंगरे, निलेश खांदवे, सचिन मासुळकर यांनी हा अजगर वनविभागाच्या धानोरीच्या हद्दीमध्ये सोडला.

नागरिकांनी साप किंवा वनप्राणी आढळले आसता ते न मारता सर्पमित्र किंवा वन कर्मचारी यांना कळवावे. पर्यावरण समतोलासाठी सर्प व प्राणी महत्वाचे आहेत, असे सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी यांनी सांगितले.
 

Web Title: Indian rock Python found at Lohagaon