एमएसआय़ लॅपटॅापची भारतातील पहिली विक्री पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पुणे : नुकाताच बाजारपेठेत आलेल्या एमएसआय़ लॅपटॅापची ( (मॉडेल : जीटी758 आरजी टायटन I9) भारतीय बाजारपेठतील डीसीसी रिटेलरसने पहिली विक्री केली. डेक्कन मॅाल येथील डीसीसी रिटेलरसचे वरिष्ठ विक्री अधिकारी प्रदिप जाधव यांनी एमएसआय़ लॅपटॅापची विक्री अनिब्रेन स्कूल ऑफ मिडिया डिझाईन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच शिकत असलेल्या मित अरोरा यांना केली. 

"गेल्या सहा-आठ महिन्यांपासून ते व्हीएफएक्स ग्राफिक्स डिझाईन, गेम डेव्हलपिंग आणि 2 डी-3 डी अॅनिमेशनसाठी विशिष्ट मॉडेल शोधत होते. बंगळुरूमध्ये तसेच पुण्यातील 8 इतर स्टोअरमध्ये जाऊन चौकशी केली होती, पण शेवटी आम्ही नव्याने आलेल्या एमएसआय लॅपटॉपची विक्री केली तेव्हा ग्राहक समाधानी झाला. आम्ही एमएसआय़ लॅपटॅापची विक्री करणारे भारतातील पहिले विक्रेते आहोत ", असे डीसीसी रिटेलरसचे जनरल मॅनेजर संतोष म्हस्के यांनी सांगितले.

सध्या बाजारपेठेतील एमएसआय़ लॅपटॅापची किंमत 3,50,000 रुपये इतकी आहे. गेमिंग हार्डवेअर जगतात नेतृत्व करणाऱ्या एमएसआय़ने या वर्षाच्या सुरुवातीला तीन मॉडेल सादर केले. हे सर्व मॅाडेलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान सहजपणे सर्वांवर प्रभाव टाकते. गेमिंग, डिझाइनिंग, प्रोग्रामिंग किंवा इतर कामगिरी संबंधित डेस्कटॉप काम असो त्यासाठी उपयुक्त ठरते. 
 
Web Title: india's first sale of msi laptop in pune

फोटो गॅलरी